आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:कर्नाटकमध्ये एक जूनपासून मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होणार, असा निर्णय घेणारे पहिले राज्य

बंगळुरूएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • शाळा-कॉलेज सुरू करण्याची परवानगी नाही : गृह मंत्रालय

कर्नाटक सरकारने एक जूनपासून राज्यातील मंदिरे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य आहे. राज्याचे मंत्री के. श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले की, मंदिर सुरू करण्यासाठी दिशानिर्देश आणि एसओपी लवकरच जारी केले जातील. लोकांना याचे पालन करावे लागेल.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशातील धार्मिक स्थळे बंद आहेत. काही संस्थानांनी लॉकडाऊनपूर्वीच भक्तांसाठी मंदिर बंद केले होते. देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू आहे. कर्नाटक सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, मंदिरे सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्राच्या पुढील दिशानिर्देशांवर अवलंबून राहील.

शाळा-कॉलेज सुरू करण्याची परवानगी नाही : गृह मंत्रालय

सध्या देशभरातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे मंगळवारी गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाने शाळा-कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिल्याचा दावा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांत करण्यात आला होता. मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी टि्वटद्वारे म्हटले की, देशभरातील शाळा-कॉलेजवरील बंदी तूर्त लागू आहे.

बातम्या आणखी आहेत...