आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Tops Policy Commission Innovation Index For Second Year In A Row, Maharashtra Second

इनोव्हेटिव्ह इंडेक्स:नीती आयोग नावीन्य इंडेक्समध्ये कर्नाटक सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसरा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक गेल्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर होते - Divya Marathi
कर्नाटक गेल्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर होते
  • इंडेक्समध्ये तामिळनाडू, तेलंगण, केरळ पहिल्या पाचमध्ये

नीती आयोगाच्या नावीन्य निर्देशांक म्हणजे इनोव्हेटिव्ह इंडेक्समध्ये कर्नाटक सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आला. आयोगाच्या बुधवारी जाहीर इंडेक्समध्ये महाराष्ट्र दुसरा, तामिळनाडू तिसरा, तेलंगण चौथ्या आणि केरळ पाचव्या क्रमांकावर आहे. आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले, निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सनुसार तयार करण्यात आला आहे. निर्देशांकात झारखंड, छत्तीसगड व बिहार सर्वात खाली आहेत. केंद्रशासित प्रदेशांत दिल्ली पहिला, ईशान्य राज्यांत हिमाचल पहिला आहे.

कर्नाटकाला जीआय नोंदणी व आयसीटीने दिली चालना

मोठ्या राज्यांचे सरासरी गुण २५.३५ राहिले. कर्नाटकाला ४२.५ गुण मिळाले. चांगल्या कामगिरीचे कारण व्हेंचर्स कॅपिटलची चांगली संख्या, जीआय (भाैगाेलिक निर्देशक) नोंदणी आणि आयसीटीची (माहिती तथा संवाद तंत्रज्ञान) निर्यात आहे. तेथे एफडीआयही वाढले आहे. बिहारला फक्त १४.५ गुण मिळाले.

बातम्या आणखी आहेत...