आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kartarpur । Gurdwara । Darbar Sahib Corridor Opened Update; Punjab CM Charanjit Singh Channi And Minister Visit Kartarpur Sahib Tomorrow

करतापूर साहिब खुले:आजपासून करतापूर कॉरिडॉर सुरू, केंद्र आणि राज्यातील 100 अधिकारी आणि 49 भाविक पाकिस्तानला जाणार; कोरोना लसीकरणाची अट अनिवार्य

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीख धर्माचे पवित्र प्रेरणास्थान असलेल्या करतारपूर कॉरिडोर यात्रेला सुरूवात झाली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या या कॉरिडोरला तब्बल 611 दिवसानंतर आज खुले करण्यात आले. पहिल्या दिवशी 100 अधिकारी आणि 49 भाविक करतारपुरची यात्रा करून गुरुद्वारामध्ये आपला माथा टेकणार आहे.

भारत-पाकिस्तान सीमा ओलांडण्याची परवानगी भेटल्यानंतर हे अधिकारी करतारपुरसाठी रवाना होणार आहे. अधिकाऱ्यांसोबत जाणाऱ्या 49 भाविकांमध्ये गुरु नानक देव यांचे 17 वे वंशज बाबा सुखदीप सिंह बेदी असणार आहे. करतारपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. सोबतच यात्रेदरम्यान कोरोना नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे.

कॉरिडॉरला जाण्याची प्रक्रिया सुलभ करा
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह गुरुवारी करतारपूर साहिब दर्शनासाठी जाणार आहे. केंद्र सरकारने करतारपूर यात्रा सुरू केल्याने बाबा सुखदीप सिंह बेदी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. सोबतच त्यांनी गृहमंत्रालयाला विनंती करत करतारपूर कॉरिडॉरला जाण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती केली आहे. ज्या लोकांकडे पासपोर्ट नाही ते देखील करतारपूर साहिबचे दर्शन घेऊ शकतील.

16 मार्च 2020 नंतर रजिस्ट्रेशन बंद झाले होते
करतारपूर साहिबचे दर्शन 16 मार्च 2020 रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर एक वर्ष आठ महिन्यानंतर भारताच्या गृह मंत्रालयाने करतारपूर साहिब कॉरिडोरला दर्शनासाठी खुले करण्याची मुभा दिली आहे. एकीकडे गुरुपर्व येऊन ठेपला असून भारत सरकारच्या या निर्णयामुळे शीख समाजात आनंदाची लाट उसळली आहे.

साडेचार कि.मी. लांबीचा करतारपूर कॉरिडॉर
कर्तापूर कॉरिडॉर सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे भारतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिब थेट जोडले गेले आहेत. 9 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे याठिकणाहून पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही.

कोविड नियमांचे करावे लागणार पालन

ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे अशानाच करतापूर साहिबाचे दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. भाविकांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवावा लागणार आहे, जो 72 तासांपेक्षा जुना नसावा. वास्तविक या दोन्ही गोष्टींसाठी पाकिस्तानने भारताला विनंती केली होती. यानंतर भारताकडून करतारपूर कॉरिडॉर उघडण्यावर सहमती झाली.

पाकिस्तानातही केली जाईल अँटिजेन टेस्ट
करतापूरला जाण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश करताच भाविकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची चाचणी केली जाणार नाही. करतार साहिबला जाणार्‍या प्रवाशाला त्याच दिवशी संध्याकाळी परतावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...