आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 66 वर्षीय बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली. स्ट्रगलच्या दिवसात सतीश कौशिक यांच्या घरी राहिलेल्या कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेयर केली. सतीश कौशिक हे एक चांगले व्यक्ती होते. तसेच ते एक चांगले घरमालकही होते, असे आर्यनने म्हटले.
तुमचे हास्य कायम लक्षात राहणार
पोस्टमध्ये कार्तिकने म्हटले की, एक महान अभिनेता, एक महान व्यक्ती, सर्वात चांगले घरमालक होते, माझ्या स्ट्रगलच्या दिवसात त्यांनी मला साथ दिली. तुमचे हिंमत वाढवणारे शब्द आणि हास्य कायम लक्षात राहिल सर, रेस्ट इन पीस.
12 जणांबरोबर रूम शेअर
2019 मध्ये ह्यूमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना कार्तिकने सांगितले होते की, जेव्हा तो चित्रपटांमध्ये काम शोधण्यासाठी मुंबईला आला. तेव्हाचे दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अनेकदा नवी मुंबई ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करत असे. इतकंच नाही तर स्ट्रगलच्या दिवसांमध्ये कार्तिक जवळपास 12 जणांबरोबर रूम शेअर करत असे.
तिसरा चित्रपट मिळेपर्यंत अंधेरीच्या फ्लॅटमध्ये राहिला
कार्तिक म्हणाला होता की, प्यार का पंचनामानंतर मला खूप जास्त चित्रपटांचे ऑफर आले नाही. तिसरा चित्रपट मिळेपर्यंत तो अंधेरीत 12 जणांबरोबर रूम शेअर करुनच राहत होता.
सतीश कौशिक यांचा वर्कआउट व्हिडिओ
सतीश कौशिक अनेकदा त्यांचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत होते. या व्हिडिओमध्ये वयाच्या 66 व्या वर्षीही ते जिममध्ये मेहनत करताना दिसत आहेत. त्यांच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि दररोज सकाळी मॉर्निंग वॉक देखील जायचे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.