आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील पॉश कॉलनीत राहणाऱ्या एका सरकारी कॉलेजच्या लेक्चररने आपल्या शिक्षिका असणाऱ्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. प्रेमविवाह अर्थात लव्ह मॅरेजच्या हट्टामुळे वडिलांनी हे क्रूर पाऊल उचलले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बाप भौतिकशास्त्राचा प्राध्यापक, लेक शिक्षिका
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असणारे नरेंद्र सिंह यादव कासगंजच्या नागरिया स्थित शेरवानी इंटर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी जवळपास 25 वर्षांपूर्वी सदर कोतवाली परिसरातील आवास विकास कॉलनीत घर बांधले होते. या बंगल्यात नरेंद्र यादवांसह त्यांची पत्नी शशी यादव, मुलगी जुही यादव व एक मुलगा घरात राहत होते. मुलगा सध्या नोएडामध्ये एसएससीची तयारी करत आहे. तर मुलगी जुही यादव कासगंज जिल्ह्यातील मिर्झापूर प्राथमिक शाळेत शिक्षिका होती.
लव्ह मॅरेजचा होता हट्ट
जुहीला स्वतःच्या इच्छेने लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलाना ही गोष्ट पसंत नव्हती. त्यांनी जुहीला खूप समजावले. पण ती तिच्या हट्टावर ठाम होती. जुहीने आई शशीसमोर वडिलांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले की, 'मी सुशिक्षित आहे. मी माझ्या पायावर उभी असल्यामुळे मी स्वतःच स्वतःचे निर्णय घेईन.'
हे ऐकून वडील नरेंद्र यादव यांना राग अनावर झाला. त्यांनी लागलीच घरात जाऊन आपली परवानाप्राप्त रायफल आणली व जुहीला गोळ्या घातल्या. यावेळी जुहीने स्वतःला वाचवण्यासाठी रायफलच्या दोरीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण गोळी तिच्या तळहातातून थेट तिच्या छातीत शिरली. यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली.
त्यानंतर लेक्चरर वडिलांनी रायफलची नाल स्वतःच्या गळ्याला भिडवून ट्रिगर दाबला. यामुळे ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. पती व मुलीची ही अवस्था पाहून शशी यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी धावत घटनास्थळी आले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप-लेकीला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच एसपी सौरभ दीक्षित यांनी पोलिस व न्यायवैद्यक पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन पुढील चौकशीचे आदेश दिले. दुसरीकडे, पोलिसांनी रुग्णालयातून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
लेक्चरर नरेंद्र सिंह यादव यांच्या निकटवर्तीय मनोज चौहान यांनी सांगितले की, जुहीचे बँक अकाउंटंटशी प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. यामुळे मुलीचे वडील नाराज झाले होते. या बदनामीच्या भीतीपोटी व लोकलाजेखातर नरेंद्र यांनी हे पाऊल उचलले. कारण ते आतापर्यंत एका स्वाभिमानी व्यक्तीसारखे जगत आले होते.
कासगंज एसपी सौरभ दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक पोलिसांसह फील्ड युनिट व सर्व उच्च अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतील. गोळी लागल्यामुळे बेशुद्ध झालेल्या मुलीसह तिच्या वडिलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.