आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तूर:दक्षिणेतील काशी कालाहस्ती नाग, हत्ती संयुक्त नावाने प्रसिद्ध, एक हजार शिवलिंग, येथे 100 खांबांचा मंडपही, 12 लाख भाविक सहभागी होणार

कालाहस्ती (चित्तूर)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये ध्वजाराेहणासह सुरू झाला ब्रह्माेत्सव, 12 दिवस चालणार शिवरात्री

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कालाहस्तीश्वर स्वामी मंदिरात ध्वजाराेहणासह ब्रह्माेत्सव सुरू झाला आहे. १८ मार्चपर्यंत हा उत्सव चालणार आहे. येथे १२ दिवस शिवरात्रीपर्यंत हा उत्सव चालेल. ब्रह्माेत्सव दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध महाेत्सवांपैकी आहे. यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक माेठ्या संख्येने सहभागी हाेतात. उत्सवातील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. गेल्या वर्षी शिवरात्री काेराेना लाॅकडाऊनच्या आधी हाेती. तेव्हा संपूर्ण उत्सवात १२ लाख भाविक सहभागी हाेतील. यावेळी भलेही काेराेना असला तरी भाविकांच्या उत्साहात काहीही कमतरता नाही. शिवरात्रीपर्यंत दीड लाख लाेक आराध्याच्या दर्शनासाठी येतील, असे मंदिर व्यवस्थापनाला वाटते.

श्रीकालाहस्ती (काेळी, नाग व हत्ती यांचे संयुक्त नाव) या ठिकाणास पंचभूत स्थळांपैकी एक मानले जाते. येथे शिवाची वायू लिंग रूपात पूजा केली जाते. मंदिर परिसरात एक सहस्र शिवलिंगे स्थापित असल्याचे मानले जाते. या क्षेत्रात राहू-केतू क्षेत्र असेही संबाेधले जाते. राहू काळात पूजेसाठी मंदिर विशेष रूपाने प्रसिद्ध आहे. येथे १०० खांबांचा मंडपही आहे.

महाेत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी भाविक श्री कालाहस्तीश्वर स्वामींच्या उत्सवादरम्यान विठाकर मंदिरापासून एक किमी उंचीवरील तिरुमलय डाेंगराच्या शिखरावर कणप्पा मंदिरापर्यंतची पालखी काढण्यात आली हाेती. तेथे पुजारी, सेवेकांनी पारंपरिक पद्धतीने ध्वजाराेहण केले. कणप्पा स्वामी भगवान शिवाचे अनन्य भक्त म्हणून आेळखले जातात.

परंपरेनुसार पहिले ध्वजाराेहरण कन्नप्पा मंदिरात हाेते. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारचे ध्वजाराेहरण श्रीवारी मंदिरात हाेणार आहे. नंतर दरराेज सकाळ-सायंकाळ दाेन वेळा मंदिर परिसरात चारही बाजूने परिक्रमा मार्गावर विविध वाहनांवर स्वार हाेऊन भगवान कालाहस्तीश्वर स्वामींची शाेभायात्रा काढली जाईल.

शिव-पार्वतीच्या दर्शनानंतर शेकडो जोडप्यांचे शुभमंगल
ब्रह्माेत्सवातील मुख्य उत्सव शिवरात्री (११ मार्च) राेजी आहे. त्यास नंदीसेवा म्हटले जाते. १२ मार्च राेजी रथाेत्सव हाेणार आहे. त्यात विशाल रथावर कालाहस्तीश्वर स्वामींची शाेभायात्रा काढली जाईल. १३ मार्च राेजी शिव-पार्वती कल्याणाेत्सव म्हणजे शिव-पार्वती विवाहाचे दर्शन करता येतील. कल्याणाेत्सवाच्या दिवशी अनेक जाेडपी विवाहबद्ध हाेतात.

बातम्या आणखी आहेत...