आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देशाचा आँखो देखा हाल:ऑगस्ट 2021 पर्यंत काशी विश्वनाथ धाम पूर्णत्वास, पण प्रकल्पावर बनारसी नाराज

वाराणसी / धर्मेन्द्रसिंह भदौरियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 800 कोटी रु. खर्चून 5.3 लाख चौरसफूूट प्रदेश विकसित केला जातोय

आता वाराणसीमध्ये दोनच गोष्टींची चर्चा प्रामुख्याने होताना दिसते आहे. पहिली-गंगेचे पाणी किती वाढले? आणि दुसरी काशी विश्वनाथ धाम योजनेचे काम (कॉरिडॉर) कडक सुरक्षा व्यवस्थेत कारागीर, इंजिनिअर व मजूर ५.३ लाख चौरसफूट प्रदेशात ८०० कोटी रुपये खर्चून तयार हाेणाऱ्या कॉरिडॉरच्या कामात व्यग्र आहेत. ऑगस्ट २०२१ पर्यंत कॉरिडॉर तयार होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. येथे उभे राहण्यास सर्वसामान्य भाविकांना जागा मिळत नव्हती. येथे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात दोन लाख भाविक एकाच वेळी येथे एकत्र येऊ शकतील. हा कॉरिडाॅर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. वाराणसीचे आयुक्त व श्रीकाशी विश्वनाथ धाम योजनेचे प्रशासकीय प्रमुख दीपक अग्रवाल यांनी सांगितले, आम्ही १५०० हून अधिक कुटुंबांना स्थैर्य दिले आहे. ६० हून अधिक लहान-मोठी मंदिरे रीस्टोअर करू. याचे काम जानेवारीत सुरू झाले आहे. आॅगस्ट २०२१ पर्यंत आम्ही कॉरिडॉरचे काम पूर्ण करू. जमिनीच्या अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे.

यानंतर मंदिर दर्शन करणाऱ्या भाविकांची संख्याही दुप्पट होईल. अहमदाबादची कंपनी प्रल्हादभाई श्रीरामभाई पटेल (पीएसपी) प्रोजेक्ट्स कॉरिडॉर बांधत आहे. कंपनीने साबरमती रिव्हर फ्रंट व गुजरात हाऊसिंग बोर्ड यासारखे मोठे सरकारी प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. काशीची ओळख असलेल्या गल्ल्या व कॉरिडॉरचे रस्त्यातील मंदिरे हटविण्यावर असल्याने बहुतांश नागरिकांत नाराजी दिसून येत आहे. आयआयटी बीएचयूमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे प्राध्यापक विश्वंभरनाथ मिश्रा यांनी सांगितले, आता जे असेल ते पारंपरिक अजिबात नसेल. असंख्य मंदिरे काॅरिडॉरसाठी तोडण्यात आली आहेत.

काशीत होईल असे बदल : मणिकर्णिका, जलाशय व ललिता घाटापासून कॉरिडॉरची सुरुवात झालेली दिसून येते. ७०% हिरवाई कायम राहावी याकडे लक्ष आहे. ललिता घाटावर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. सुरक्षेसाठी इंटिग्रेटेड कमांड सेंटर असेल. विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये सुमारे ३१०० चौरस मीटर मंदिर परिसर असणार आहे.

0