आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलजारही ज्यांचे लेखन वाचतात त्यांचे मत...:शिक्षक-विद्यार्थ्यांत पुस्तकाची पाने हा एकच धागा नसतो... त्या पानांत आयुष्यही असते

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
काशीनाथ सिंह, साहित्यिक आणि बीएचयूचे निवृत्त प्राध्यापक - Divya Marathi
काशीनाथ सिंह, साहित्यिक आणि बीएचयूचे निवृत्त प्राध्यापक
  • सुदैवाने मी अशा विद्यापीठात प्राध्यापक होतो, जे स्वायत्त होते.

मला अध्यापकी पेक्षातून निवृत्त होऊन २५ वर्षे झाली. तरीही एक शिक्षक म्हणून तुमच्यासमोर आहे. हजारीप्रसाद द्विवेदी आमचे शिक्षक होते. त्यांनी बाणभट्टाच्या आत्मकथेत लिहिले आहे की, न्याय जेथे मिळेल तिथून तो बळाचा वापर करून खेचून आणा. कोणालाही घाबरू नका. लोकांनाही नाही. वेदांनाही नाही. गुरूंनाही नाही ना मंत्रांना. ते निर्भय होण्याचे शिक्षण द्यायचे आणि असहमतीचा सन्मान करायचे. या असहमतीच्या सन्मानाने त्यांच्या एका विद्यार्थ्याला टीकेचा शिखरपुरुष नामवर सिंह बनवले. पंडितजींकडून आम्ही शिकलो की, असहमती ही विरोध नसते, ती विचारांचे द्वंद्व पुढे नेत असते. त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून नव्हे, तर सदैव मित्र म्हणून वागवले. त्याचीच परिणती म्हणजे आमचे काही विद्यार्थी आज प्रतिष्ठित कवी आणि कथाकार आहेत. त्यातील दोघांचा उल्लेख येथे करावा लागेल. कवी दिनेश कुशवाह आणि कथाकार देवेंद्र. आमचा विकास असहमतीतूनच झाला. आजही देवेंद्र यांच्या अनेक कथा आहेत, ज्यांचा मला हेवा वाटते.

सुदैवाने मी अशा विद्यापीठात प्राध्यापक होतो, जे स्वायत्त होते. पोलिस आणि कॅबिनेट मंत्र्यांनाही विद्यापीठ परिसरात येण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागायची. आम्हाला अभ्यासक्रम निर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य होते. अभ्यासक्रम तयार करताना आम्ही मानवी मूल्यांची जपवणूक करायचो. आज विद्यापीठात अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिकवावे लागते. अभ्यासक्रमही तेच ठरवतात. प्रेमचंद यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या लेखकाची रचना अभ्यासक्रमात असेल तर तुम्हाला गपगुमान शिकवावे लागते. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी पाने नसतात हे आधी लक्षात घ्यावे लागेल. त्या पानांत आयुष्यही असते. आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून जीवनाची शिकवण देत असतो. संघर्ष करायला शिकवतो. वर्तमान व्यवस्थेत हा ताळमेळ डळमळीत झाला आहे.

येण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागायची. आम्हाला अभ्यासक्रम निर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य होते. अभ्यासक्रम तयार करताना आम्ही मानवी मूल्यांची जपवणूक करायचो. आज विद्यापीठात अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिकवावे लागते. अभ्यासक्रमही तेच ठरवतात. प्रेमचंद यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या लेखकाची रचना अभ्यासक्रमात असेल तर तुम्हाला गपगुमान शिकवावे लागते. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी पाने नसतात हे आधी लक्षात घ्यावे लागेल. त्या पानांत आयुष्यही असते. आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून जीवनाची शिकवण देत असतो. संघर्ष करायला शिकवतो. वर्तमान व्यवस्थेत हा ताळमेळ डळमळीत झाला आहे.

शिक्षण संस्थांची व्यवस्था निरस नसावी. ती प्रफुल्लित हवी. मी एक उदाहरण देतो. माझ्या विद्यार्थीदशेत प्रसिद्ध विद्वान सीताराम चतुर्वेदी यांचे पुत्र धर्मशील चतुर्वेदी आर्ट््स महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्या हास्याने महाविद्यालयाचा परिसर दणाणून जायचा. आज असे मोकळ्या मनाने हसलो तर प्रॉक्टोरियल बोर्ड वा पोलिसांना पाचारण केले जाते. विद्यापीठांतील उल्हास लोपला आहे.

(काशीनाथ सिंह, साहित्यिक आणि बीएचयूचे निवृत्त प्राध्यापक)

बातम्या आणखी आहेत...