आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kashmir Election 2020 : National Conference, PDP Fielded Dummy Candidates, Crop Of Rebels Too!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीर निवडणूक ग्राउंड रिपोर्ट:नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपीने उतरवले डमी उमेदवार, बंडखाेरांचेही पीक!

हारुण रशिद । श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीर निवडणूक : गुपकारअंतर्गत मतभेद, आघाडीपासून उमेदवारी निवडीपर्यंत तणाव

थंडीच्या माेसमात काश्मीर खाेऱ्यात सामान्यपणे बर्फवृष्टी व पर्यटनाची सर्वत्र चर्चा असते. परंतु यंदा पालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. जणू त्याने थंडीवरही मात केलीय. २८ नाेव्हेंबरपासून हाेणाऱ्या निवडणुकीत खाेऱ्यातील सहा प्रमुख पक्षांची गुपकार आघाडी मैदानात उतरल्याने राजकीय घडामाेडींना वेग आला आहे.

या आघाडीत अब्दुल्ला कुटुंबाच्या नेतृत्वाखाली नॅशनल काॅन्फरन्स, मुफ्ती कुटुंबाच्या नेतृत्वाखालील पीडीपी याशिवाय इतर चार पक्षांचाही समावेश आहे. गुपकार संघटनेच्या म्हणण्यानुसार कलम ३७० व ३५ ए पुन्हा लागू करण्यासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. परंतु निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या निर्णयापासून आपल्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही आघाडी चांगलीच वादात अडकली आहे. भारत सरकारने ५ आॅगस्ट २०१८ राेजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवले आणि त्याला राज्याएेवजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेव्हा नॅशनल काॅन्फरन्स व पीडीपीने पूर्वस्थिती बहाल करेपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली हाेती. परंतु आता हे पक्ष निवडणूक लढवत आहेत. दाेन्ही पक्षांतील काही नेत्यांनी या निर्णयाला विराेध केला. नॅशनल काॅन्फरन्सचे माजी नेते रुहुल्ला मेहदी यांनी यासंबंधी ट्वीट केले. आघाडी या लहानशा निवडणुकीवर बहिष्कार टाकू शकलेली नाही. मग मुख्य निवडणुकीवर काय बहिष्कार घालेल? ही निवडणूक म्हणजे दिल्लीने घेतलेली एक परीक्षा हाेती. त्यात आपण अपयशी ठरलाे, असे त्यांनी स्वकीयांना सुनावले. याच पक्षाचे प्रवक्ते इम्रान नबी डार म्हणाले, आघाडी भाजपसाठी हा प्रदेश खुला ठेवू शकत नाही. उद्या भाजप आपल्याकडे बहुमताची स्वीकृती असल्याचा दावा करू शकतो. वास्तविक त्यात तथ्य नाही. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून गुपकारच्या नेत्यांना दिल्लीचे भय दाखवले जात आहे. भूमी, घर व नाेकऱ्यासंबंधी सरकारच्या अलीकडच्या आदेशांचा उल्लेख करून ही नेतेमंडळी लाेकांमध्ये एक प्रकारची भीती िनर्माण करू पाहत आहेत. भाजप या निवडणुकीत जिंकल्यास लाेकांसमाेर अस्तित्वाचा धाेका निर्माण हाेईल, अशी भीती घातली जात असल्याचे दिसते.

स्थानिक नेत्यांचा राजीनामा - जागावाटपावरून पीडीपीचे काही नेते नाराज आहेत. निवडणुकीत नॅशनल काॅन्फरन्सला जास्त भागीदारी देण्यात आल्याचा त्यांचा आराेप आहे. माेठा जनाधार असलेल्या भागातील जागा नॅशनल काॅन्फरन्सला दिल्याचा दावा पीडीपीचे संस्थापक सदस्य व माजी उपमुख्यमंत्री मुजफ्फर बेग यांनी केला अाहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आघाडी असतानाही गुपकारच्या घटक पक्षांनी अनेक जागांवर डमी उमेदवारही उतरवले आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी नॅशनल काॅन्फरन्स व पीडीपीच्या स्थानिक नेत्यांनी राजीनामा दिला. ते स्वतंत्र लढत आहेत. मात्र सूत्रांच्या मते, हे उमेदवार जिंकल्यास ते पुन्हा पक्षात परत येतील. मात्र त्याबद्दल सध्या भविष्यवाणी करता येणार नाही.

पंचायत निवडणुकीप्रमाणे भाजपला नाही फ्री पास

काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पंचायत निवडणुकीवर खाेऱ्यातील पक्षांनी बहिष्कार टाकला हाेता. त्यामुळे भाजपचे समर्थन असलेले सर्व उमेदवार बिनविराेध विजयी झाले. परंतु या वेळी अशी स्थिती नाही. आता भाजपला आव्हानाचा मुकाबला करावा लागेल. गुपकार देशविराेधी असल्याचे भाजप म्हणू लागला आहे. केंद्रीय मंत्री डाॅ. जितेंद्र सिंह म्हणाले, कलम ३७० चे समर्थन करत असल्यास गुपकार आघाडीने संसदेतील आपल्या खासदारांना माघारी बाेलावले पाहिजे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser