आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर:अतिरेक्यांनी ओळखपत्रे तपासली; शीख प्राचार्या, हिंदू शिक्षकाची हत्या, हल्ल्यामागे नवी संघटना टीआरएफ

श्रीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरात अतिरेक्यांनी सामान्यांवर हल्ले वाढवले आहेत. श्रीनगरात मंगळवारी प्रख्यात केमिस्ट काश्मिरी पंडित मखनलाल बिंद्रूंच्या हत्येनंतर अितरेक्यांनी गुरुवारी ईदगाह भागातील सरकारी शाळेत घुसून शीख प्राचार्या व एका हिंदू शिक्षकाची गोळी झाडून हत्या केली. कराचीहून संचालित होणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

शाळेतील एका शिक्षकाने दै. भास्करला सांगितले की, ‘सकाळी ११:१५ वाजता सशस्त्र अतिरेकी शाळेत घुसले. ते थेट स्टाफरूममध्ये गेले. तेथे सर्वांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. यानंतर फक्त प्राचार्या सुपिंदर कौर व शिक्षक दीपक चंद यांना स्टाफरूमबाहेर नेले. बाहेर जाताच गोळीबाराचा आवाज आला. आम्ही येऊन पाहिले असता दोघेही जमिनीवर कोसळलेले होते. अतिरेक्यांनी पळ काढला होता. या घटनेनंतर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले, दहशत पसरवण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. गेल्या ५ दिवसांत खोऱ्यात ७ नागरिकांची हत्या झाली आहे.

सुपिंदर कौर आपला निम्मा पगार गरीब मुलांवर खर्च करायच्या, अनाथ मुस्लिम मुलीस दत्तक घेतले होते अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार सुपिंदर कौर अत्यंत परोपकारी होत्या. त्या दर महिन्यात आपला अर्धा पगार गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करायच्या. त्यांनी एका मुस्लिम अनाथ चिमुकलीस दत्तक घेतले होते. मुलीच्या पालनपोषणासाठी सुपिंदर कौर यांनी एका ओळखीच्या मुस्लिम कुटुंबाकडे तिला सोपवले होते. या मुस्लिम कुटंुबाला सुपिंदर दरमहा १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करायच्या.

संतप्त शीख समुदाय म्हणाला, जोवर सुरक्षा नाही, तोवर काम नाही; कुठे आहेत मौलाना, कुठे आहेत मुफ्ती?
आॅल पार्टीज शीख कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष जगमोहनसिंह रैना म्हणाले, हे हल्ले खोऱ्यातील बहुसंख्याक-अल्पसंख्याकांत फूट पाडण्याच्या कटाचा भाग आहे. सरकार आम्हाला मजबूत सुरक्षा देत नाही, तोवर आम्ही कार्यालयांत काम करणार नाही.’ शीख समुदायाच्या काही संघटनांनी याबाबत बैठक घेतली. एका संघटनेने सांगितले की, ‘न्याय मिळेपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. हा कोणता जिहाद आहे? सुपिंदर या शिक्षिका होत्या, मुलांना शिकवत होत्या. आज मौलाना-मुफ्ती कुठे आहेत? त्यांनी तोंड उघडायला हवे.’

बातम्या आणखी आहेत...