आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir। Lockdown । Effect । Lockdown Causes Mental Health Problems In Kashmir Children, Children In Kashmir Away From School

ग्राउंड रिपोर्ट:लॉकडाऊनमुळे काश्मीरच्या मुलांत मानसिक समस्या, काश्मीरमधील मुले शाळेपासून दूर

मुदस्सीर कुल्लू । श्रीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीर खाेऱ्यातील शाळकरी मुले दाेन वर्षांपासून शाळेपासून दूर आहेत. काेराेनाकाळात त्यांना घरात कैद व्हावे लागले. टीव्ही, स्मार्टफाेन इत्यादीला चिकटून राहिल्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आराेग्यावर खाेलवर परिणाम हाेत असल्याचे दिसून आले आहे. श्रीनगरमध्ये मुलांच्या मानसिक समस्यांवर काम करणाऱ्या सीजीडब्ल्यूसी सेंटरमध्ये दरराेज १५ मुले काउन्सेलिंगसाठी जात आहेत.

या सेंटरवर दाेन वर्षांत १४ हजार मुले सहभागी झाली. पुलवामा येथून मुलाला घेऊन आलेले एक जण म्हणाले, माझा मुलगा आठवीत शिकताे. आतापर्यंत सगळ्या परीक्षांत ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळवायचा. परंतु सात महिन्यांत त्याच्या वागणुकीत खूप बदल झाला. दिवसभर ताे टीव्हीला चिकटलेला असताे. दु:खी असताे. त्याची भूक जणू संपली हाेती.

बळजबरी केल्यानंतर कसाबसा भात खायचा. येथील डाॅक्टर समुपदेशनाद्वारे अशा मुलांना अभ्यासाची पुन्हा गाेडी लागावी यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. उपचारानंतर त्याच्या आराेग्यात खूप सुधारणा झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट २०१९ नंतर मुले शाळेपासून दूर झाली हाेती. काेराेनापूर्वीही अनिश्चितता, दगडफेक, बंद व दहशतवादामुळे येथील लाेक अगाेदरच निराशेत हाेते.

काेराेनाने नैराश्य आणखी वेगाने वाढवले. त्याची अनेक उदाहरणेही दिसून आली. दाेन वर्षांपूर्वी झालेल्या अनेक पाहणयांमधून काश्मीरमधील सुमारे ४५ टक्के लाेकसंख्या चिंता, नैराश्य व इतर मानसिक आजारांनी पीडित असल्याचे दिसून आले हाेते. यंदा जवाहरलाल नेहरू मेमाेरियल रुग्णालयातील डाॅक्टरांद्वारे एक पाहणी करण्यात आली.

त्यात गंभीर चिंता निर्माण करणारे ९४.२ टक्के रुग्ण आढळून आले.काेविड व लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर दुष्परिणाम झाला आहे. सीजीडब्ल्यूसीमध्ये १३ वर्षीय मुलावर उपचार केला जात आहे. त्याची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. त्याला दिवस लक्षात राहत नव्हता. रात्र जागून रडत राहायचा. ताे खूप हट्टी झाला हाेता.

आई-वडिलांनी मोबाइल, कलहापासून मुलांना दूर ठेवावे
क्लिनिकल मानसोपचार तज्ञ वसीम राशीद कारू म्हणाले, काश्मीरमध्ये कोविडकाळात मुलांमध्ये कौटुंबिक मुद्द्यामुळे मानसिक तणावात वाढ झाली. म्हणूनच आम्ही आई वडिलांना घरातील कलहापासून मुलांना दूर ठेवण्याचा सल्ला देत असतो. मोबाइलदेखील मर्यादित वापरावा. आम्ही वेळेचे नियोजन, राग व्यवस्थापन व तणाव व्यवस्थापन, सामाजिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करतो.

बातम्या आणखी आहेत...