आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Police's Campaign Case Registered Under UAPA Against People Carrying Out Anti India Activities In Foreign Countries

श्रीनगर:परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध जम्मूत गुन्हे दाखल, दहशतवाद्यांनी उघड केले काश्मिरी डॉक्टरचे नाव

श्रीनगर / हारुण रशीद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करणारे, दहशतवाद्यांबाबत सहानुभूती ठेवणारे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध जम्मू-काश्मीर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाद्वारे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून ब्रिटन, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

सोशल मीडियावर देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून ब्रिटनस्थित काश्मिरी वंशाच्या व्यक्तीवर गेल्या आठवड्यात यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील सय्यद झिशान यांनी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मुजम्मिल अय्युबच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशीत असे आढळले की, अय्युब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतविरोधी कारवाया करत होता.

दहशतवाद्यांनी उघड केले काश्मिरी डॉक्टरचे नाव
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सौदी अरेबियात राहणारा काश्मिरी डॉक्टर आसिफ मकबूल डार आणि सज्जाद गुल या पाकिस्तानी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. प्रॉपर्टी डीलरच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी सांगितले की, आसिफ मकबूल डार आणि सज्जाद गुल यांच्या इशाऱ्यावर आम्ही काम करत होतो. डार सौदी अरेबियात होता.

बातम्या आणखी आहेत...