आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Preferred For Web music Series, Focus On Rural Areas For Shooting; Local Actors In Lead Roles

सुखद:वेब-संगीत मालिकांसाठी काश्मीरला प्राधान्य, शूटिंगसाठी ग्रामीण भागावर भर; मुख्य भूमिकेत स्थानिक कलाकार

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरचे निसर्गसाैंदर्य फक्त बॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांनाच आकर्षित करते असे नाही, तर वेब आणि म्युझिक सिरिजसाठीही खाेरे पसंतीचे चित्रीकरण केंद्र बनते आहे. प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री जरिना वहाब गेल्या आठवड्यात श्रीनगरच्या बाहेरील हरवान येथे तिच्या उर्दू वेबसिरीज “अरमान”च्या चित्रीकरणासाठी ४५ वर्षांनंतर प्रथमच काश्मीरमध्ये आली. वहाब म्हणाली, “१९७७ मध्ये मी गुलमर्गमध्ये दोन दिवस व्यतीत केलेे होते. या वेळी मी दोन आठवडे येथे आहे आणि मला परत जावेसेच वाटत नाही. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे इथे वास्तव्य केले आहे.

खाेऱ्यात चित्रपट निर्मिती पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक कलाकारांनाही संधी मिळू लागली आहे. प्रादेशिक टीव्ही शो रद्द झाल्यामुळे संघर्ष करत असलेले काश्मिरी कलाकार आता मुख्य प्रवाहात परतत आहेत. ‘अरमान’मध्ये रहमत रतन, आयेश आरिफ, जमीर आशा, हसन जावेद यांच्यासह खाेऱ्यातील अनेक स्थानिक कलाकार आहेत.

जावेद सांगतात, “पहिल्यांदाच काश्मिरी कलाकारांना मुख्य भूमिकेत सहभागी करून घेतले जात आहे, जसे पूर्वी कधीही नव्हते. त्याचबरोबर देशभरातील निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण राज्यात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोजिलीन खानलाही अलीकडेच खाेऱ्यात वेब आणि संगीत मालिकेचे शूटिंग करताना आनंद झाला. ती म्हणाली, ‘इतर ठिकाणी जसे जाणवताे, तसा मला येथे शूटिंगदरम्यान थकवा जाणवला नाही. कोणत्याही तणावाशिवाय मी येथे शूटिंगचा आनंद लुटला. मला इथे पुन्हा पुन्हा यायचं आहे आणि इतर चित्रपट निर्मात्यांनाही इथे यायचं आहे. ती तंगमार्ग येथे शूटिंग करत होती. स्थानिक अभिनेत्री मुस्कान म्हणते, “येथील तरुणांमध्ये गुणवत्ता आहे, पण संधींचा अभाव आणि अनिश्चिततेमुळे ते रोजगारापासून दूर आहेत. आशा आहे की, येत्या चार वर्षांत परिस्थिती सुधारेल, आणि बॉलीवूडच्या िवस्तृत क्षेत्रात येथील कलाकारांची उपस्थितीदेखील दिसून येईल.

भद्रवाह आणि किश्तवाड ही निर्मात्यांची पसंती यापूर्वी काश्मीरमध्ये येणारे बहुतेक लोक पर्यटन आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी श्रीनगर, गुलमर्ग आणि सोनमर्गपर्यंत मर्यादित होते. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात तुलनेने बेरोजगारी जास्त हाेती. पण खोऱ्यातील चांगल्या परिस्थितीमुळे बॉलीवूड आता गुलमर्ग आणि पहलगामपेक्षा वेगळी, ग्रामीण काश्मीरमधील नवीन ठिकाणे शूटिंग करण्यासाठी शोधत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांंच्या मते एकेकाळी सर्वाधिक दहशतवाद असलेली भद्रवाह आणि किश्तवाडसारखी ठिकाणे बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...