आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terror Group Threatens Kashmir RSS Leaders; Resistance Front Released Target List | RSS | Mohan Bhagwat

दहशतवाद्यांची काश्मीरच्या RSS नेत्यांना धमकी:रेझिस्टन्स फ्रंटने 30 नेत्यांची टार्गेट लिस्ट केली जाहीर, रक्त सांडण्याचा इशारा

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रीय नेत्यांना धमकी दिली आहे. रेझिस्टन्स फ्रंटने 30 नेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार फ्रंटने म्हटले की, आम्ही या नेत्यांचे रक्त सांडू.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी 1 एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यानंतर दहशतवादी गटाची ही धमकी आली आहे. भागवत म्हणाले होते- स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही पाकिस्तान खुश नाही. फाळणी ही चूक होती हे त्यांना आता पटले आहे. संयुक्त भारत हे वास्तव होते आणि विभाजित भारत हे दुःस्वप्न होते.

भागवत म्हणाले होते- जे भारतापासून वेगळे झाले, ते सुखी आहेत का?

अखंड भारत म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि तिबेट हे सत्य असल्याचे भागवत म्हणाले होते. विभाजित भारत हे एक वाईट स्वप्न आहे. हा 1947 पूर्वीचा भारत होता. जिद्दीमुळे जे भारतापासून वेगळे झाले, ते सुखी आहेत का? ते आज दु:खात आहेत. भारतामध्ये सुख आहे.

खाली पाहा दहशतवाद्यांची टार्गेट लिस्ट...

रेझिस्टन्स फ्रंट ही लश्कर ए तैयबाची शाखा, 2020 पासून सक्रिय

जम्मू-काश्मीरमधील सक्रिय रेझिस्टन्स फ्रंट ही लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या विरोधात ही फ्रंट ऑनलाइन मोहीमही चालवते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या फ्रंटने कराचीतील या ऑनलाइन मोहिमेच्या 6 महिन्यांनंतरच आपली संघटना तयार केली. ही तेहरिक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गझनवी हिंद या इतर संघटनांसारखीच आहे.

या संघटनेने 2020 नंतर जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली. त्याच्याशी संबंधित लोकांना सोपोरमधून अटक केल्यावर ही फ्रंट उघडकीस आली. एकेकाळी येथे लश्कर, जैश आणि हिजबुलचा मोठा प्रभाव होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी सांगितले होते की, ते नवीन संघटनेसाठी भरती करत आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले होते की, 2022 मध्ये मारले गेलेले बहुतेक दहशतवादी हे रेझिस्टन्स फ्रंट किंवा लश्करचे होते. त्यांची संख्या 108 होती. मारल्या गेलेल्या जैशच्या दहशतवाद्यांची संख्या 35 होती.

हेही वाचा...

रोखठोक:भारत-पाक फाळणी कृत्रिम, पाकिस्तानीही चूक मान्य करत आहेत : सरसंघचालक मोहन भागवत

भारत-पाकिस्तानची फाळणी कृत्रिम असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. तुम्ही फक्त त्या भारतातून या भारतात आला आहात. पूर्ण हिंदूस्तान आपले आहे. आपण आपल्या जमिनीला विसरता कामा नये असे भागवत भोपाळमध्ये आयोजित अमर शहीद हेमू कालाणी जन्मशताब्दी वर्ष समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात सिंधी संस्कृती संग्रहायल उभारण्याची घोषणा केली. ते म्हणाले की मध्य प्रदेशच्या शालेय पुस्तकांत सिंधी महापुरुषांचा इतिहास शिकवला जाईल. सम्राट दाहिर सेन, हेमू कालाणींचा जीवनक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. येथे वाचा संपूर्ण बातमी

RSS ने म्हटले- लग्न केवळ विरुद्धलिंगी व्यक्तींमध्येच शक्य:होसबळे म्हणाले- समलिंगी विवाहाबाबत सरकारच्या भूमिकेशी आम्ही सहमत

पानिपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी बैठकीत सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी समलिंगी विवाहाबाबत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. होसबळे म्हणाले की, विवाह केवळ विरुद्ध लिंगाच्या लोकांमध्येच होऊ शकतो. बैठकीच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रय होसाबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी