आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काश्मीर:उष्ण, काेरड्या हवामानामुळे केशर उत्पादन निम्मे होण्याची शक्यता, दोन आठवड्यांत पाऊस न झाल्यास मोठे नुकसान

मुदस्सीर कुलू | श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 टन केशराचे उत्पादन काश्मिरात होते, 80% लाख रु. प्रति किलोपर्यंत विकते केशर

संपूर्ण जगात सर्वात महागडा मसाला केशर पिकवणारा शेतकरी सध्या काश्मिरात पावसाची कमतरता आणि उष्ण हवामानामुळे चिंतेत आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात अवकाळी बर्फ आणि नंतर कलम ३७० हटवल्यानंतर अनेक महिन्यांच्या संचारबंदीनंतर केशर उत्पादक शेतकरी चांगल्या पिकाच्या शक्यतेबाबत साशंक होते. मात्र कमी पाऊस, कोरडे हवामान आणि उष्णता शेतकऱ्यांच्या आशेवर बर्फवृष्टी झाल्यासारखी सिद्ध झाली आहे. दक्षिण काश्मीरच्या पंपोर भागात केशर उत्पादक मोहंमद अश्रफ म्हणाले, हवामानाचे संकेत आमच्यासाठी आता आणखी एका आपत्तीसारखी आहे. कोरड आणि उष्ण हवामानामुळे केशर शेतजमिनीत भेगा पडल्या आहेत. एका हेक्टरमध्ये केशरची शेती करणारे अश्रफ म्हणाले, येत्या दोन आठवड्यांत पाऊस न झाल्यास आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल आणि केशरची पूर्ण वाढ होणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अवकाळी बर्फवृष्टीमुळे केशरचे उत्पादन खूप कमी राहिले आणि अश्रफ केवळ दोन हजार किलो पिकवू शकले होते. एक हेक्टर शेतीत जवळपास ४ किलो केशर पिकते. ग्राहकांच्या मागणीनुसार एक किलो केशरची किंमत २ ते ३ लाख रुपयांपर्यंत असते. अश्रफ म्हणाले, सरकार सिंचन सुविधा उपलब्ध करण्यात आतापर्यंत अयशस्वी ठरले आहे. आमच्याकडे सिंचनाच्या चांगल्या सुविधा असल्या असत्या तर पावसावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नसती. केशरचे फूल हवामानाप्रति खूप संवेदनशील असते. त्यामुळे याचे उत्पादन हवामानाची स्थिती आणि सिंचन सुविधेवर अवलंबून असते. केशर उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल मजिद म्हणाले, पावसाच्या कमतरतेमुळे सध्या आम्ही अापली शेती करू शकत नाही. येत्या काही आठवड्यांपर्यंत पाऊस न पडल्यास केशर उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान होईल. आम्ही केवळ चांगल्या पावसासाठी प्रार्थना करू शकतो. खोऱ्यात १६ कुटुंबे केशर उत्पादनाशी जोडली आहेत.

ऑगस्टमध्ये तापमान ४० वर्षांच्या उच्च पातळीवर

काश्मीरमध्ये या वर्षी ऑगस्टमध्ये विक्रमी ३६ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. एवढे जास्त तापमान ४० वर्षांत प्रथमच झाले आहे. हवामान विभागाचे संचालक सोनम लोटस म्हणाले, सध्या सामान्य तापमान ६ अंशांपेक्षा कमी नाेंदले आहे. जुलैमध्ये काश्मीरमध्ये २०२ मिमी पाऊस झाला. सध्या पाऊस सरासरी पाऊस ७०८ मिमीच्या तुलनेत २९८ मिमी नोंदला गेला आहे.

सर्वात चांगली गुणवत्ता

> १६ टन केशरचे उत्पादन होते काश्मीरमध्ये

> काश्मीरमध्ये ८० टक्के उत्पादन दरवर्षी एकट्या पुलवामाच्या पंपोरमध्ये

> आशियात केशर प्रामुख्याने दोन ठिकाणी इराण आणि काश्मीरमध्ये पिकवले जाते.

> केशर काश्मीरच्या तीन जिल्ह्यांत पुलवामा, श्रीनगर व बडगाम खाेऱ्यात होते.

> पुलवामा जिल्ह्यात पंपोर भागात सर्वात जास्त केशरचे उत्पादन घेतले जाते.

> खोऱ्यात १६ हजार कुटुंशे केशरची शेती करतात आणि १६ टन वार्षिक केशर पिकवतात.

७५ हजार फुलांतून एक पाउंड केशराचे उत्पादन

केशर आणखी काही नव्हे तर केशरच्या फुलाचे(क्रॉकस) वर्तिकाग्र(स्टिगमा) असते. एका फुलात तीन वर्तिकाग्र असतात. सुमारे ७५ हजार फुलांच्या वर्तिकाग्र मिळून एक पाउंड(४५३ ग्रॅम) केशर तयार होते.