आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Target Killing: Bank Manager Vijay Kumar Funeral Photos Rajasthan Updates | Marathi News

काश्मीरमध्ये हत्या झालेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार:तरुण मुलाचा मृतदेह पाहून आईचा टाहो, म्हणाले होते नोकरी सोडून दे

नोहर(हनुमानगड)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे बळी ठरलेले बँक मॅनेजर विजय कुमार यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या गावात आणण्यात आला. मृतदेहासोबत विजयची पत्नी मनोज कुमारीही होती. संपूर्ण रस्त्यात त्या धीर धरून बसल्या होत्या पण घराच्या उंबरठ्यावर येताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि सासूच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागल्या. त्यानंतर बेशुद्ध झाल्या. विजय कुमारच्या आई आणि वडिलांच्या बाबतीतही असेच होते. पालक पुन्हा पुन्हा बेशुद्ध होत होते.

मुलाचा मृतदेह पाहून आई त्याला बिलगून राहिली आणि पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली, 'मी तुला सांगितले होते, नोकरी सोड, तू कमी कमावशील, पण तू ऐकले नाहीस.' कधी ती सुनेला सांभाळत होती तर कधी मुलाकडे बघून स्वतःच रडायची. मृतदेह येण्यापूर्वीच ग्रामस्थ व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती. यानंतर काही वेळात अंत्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी नऊच्या सुमारास विजय कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधीला संपूर्ण गाव जमा झाले
विजयच्या हत्येनंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी ही दुःखद बातमी आल्यापासून गावातल्या एकाही घरात चूल पेटलेली नाही. विजयच्या घरी लोकांची ये-जा सुरूच होती. रात्री सुध्दा अनेक लोक स्वतःच्या घरी गेले नाहीत. सकाळी मृतदेह गावात पोहोचला. शेवटच्या प्रवासात संपूर्ण गाव जमा झाले. काल बँक मॅनेजर विजय यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

दोन दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती
विजय कुमारच्या पत्नीने कुटुंबीयांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तेथील एका शिक्षकाची हत्या झाल्यापासून विजय कुमार देखील चिंतेत होते आणि ते सांगत होते की, येथे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आपल्याला जाण्याची गरज आहे. आम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. नेहमीप्रमाणे बँकेत गेल्याचे त्यांनी सांगितले. काळजी करू नको म्हणत बँकेत गेले. संध्याकाळी वेळेवर येईन म्हणाले. दिवसभर अनेकवेळा फोनवर बोलत होते, पण या घटनेने सर्व काही हिरावून घेतले.

4 महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्येच झाले होते लग्न. 1 महिन्यापूर्वीच तो पत्नीला घेऊन काश्मीरला गेला होता.
4 महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्येच झाले होते लग्न. 1 महिन्यापूर्वीच तो पत्नीला घेऊन काश्मीरला गेला होता.
बातम्या आणखी आहेत...