आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kashmir Terror Attack: 2 CRPF Jawans Martyred In Terrorists Firing In Pampore, 3 Hospitalized

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरात दहशतवादी हल्ला:पांपोर जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार; 2 जवान शहीद, 3 जण जखमी

श्रीनगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मारले होते 2 दहशतवादी

जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. पुलवामा जिल्ह्यातील पांपोर येथे सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. यात 2 जवान शहीद झाले असून 3 जण जखमी आहेत. हा हल्ला आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. सीआरपीएफच्या 110 व्या बटालियन आणि जम्मू काश्मीरच्या पोलिस दलाचे संयुक्त पथक येथून जात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी मार्ग अडवून अचानक बेछूट गोळीबार केला.

यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोराच्या संबुरा परिसरात चकमक उडाली होती. यात संयुक्त पथकाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.

गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि लष्करी ताफ्यांवर दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. 16 ऑगस्ट रोजी बारामुलाच्या पट्टन परिसरात सुद्धा सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 2 जवान शहीद झाले होते. तर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. तत्पूर्वीही 14 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी जवानांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...