आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Terrorist Attack News And Updates | A Non Local Vendor From Bihar Killed By Terrorists In Srinagar

दहशतवाद्यांनी दोन बिगर काश्मिरींना केले ठार:श्रीनगरमध्ये बिहारच्या रस्त्यावरील फेरीवाल्यावर झाडल्या गोळ्या, पुलवामामध्ये यूपीच्या मिस्त्रीची केली हत्या

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शनिवारी पुन्हा एकदा बाहेरील नागरिकांना ठार केले. श्रीनगरमधील ईदगाह भागात दहशतवाद्यांनी बिहारच्या एका रस्त्यावरच्या विक्रेत्याला गोळ्या घातल्या. त्याला गंभीर अवस्थेत श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरविंद कुमार साह असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दुसऱ्या घटनेत, दहशतवाद्यांनी शनिवारीच पुलवामामध्ये सगीर अहमद नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यूपीचा रहिवासी असलेला सगीर मिस्त्री म्हणून काम करायचा. पुलवामाच्या काकापोरामध्येच सुरक्षा दलांना लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला करण्यात आला.

घटनेनंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 8 नागरिकांचा बळी घेतला आहे.

गेल्या 11 दिवसात 3 मोठे हल्ले

7 ऑक्टोबर: शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकाची हत्या
श्रीनगरमध्ये ईदगाह परिसरातील शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची हत्या केली. यामध्ये प्राचार्य सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांचा समावेश होता. शीख समाजातील सुपिंदर आणि दीपक चंद काश्मिरी पंडित दोघेही श्रीनगरमधील अलोचीबागचे रहिवासी होते. त्यांचे ओळखपत्र तपासल्यानंतर दहशतवाद्यांनी दोघांनाही गोळ्या घातल्या.

5 ऑक्टोबर: प्रसिद्ध फार्मासिस्टला गोळी मारली
प्रसिद्ध फार्मासिस्ट मखनलाल बिंद्रू यांची श्रीनगरच्या इक्बाल पार्क परिसरात दहशतवाद्यांनी त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये घुसून गोळ्या घालून हत्या केली.

5 ऑक्टोबर: बिहारच्या रस्त्यावरील विक्रेत्याला गोळी झाडली
बिंद्रूवरील हल्ल्याच्या एक तासानंतर अवंतीपोराच्या हवाला भागात बिहारचे वीरेंद्र पासवान दहशतवाद्यांनी ठार झाले. वीरेंद्र भेलपुरी आणि गोलगप्पाच्या गाड्या लावायचा. तो भागलपूरचा रहिवासी होता. काही मिनिटांनी बांदीपोराचा मोहम्मद. शफी लोन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 200 बिगर मुस्लिमांना ठार मारण्याचे ठेवले लक्ष्य
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर 200 बिगर मुस्लिम आहेत. जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि बिगर मुस्लिमांवर हल्ला करण्याचे मोठे षड्यंत्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) रचले जात आहे. या संदर्भात, नुकतीच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक गुप्त बैठक झाली. अनेक मीडियाने या बैठकीबाबत खुलासा केला आहे. आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील ही गुप्त बैठक 21 सप्टेंबर रोजी झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील गुप्त बैठकीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...