आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आखो देखा हाल:काश्मीर खोऱ्याने 11 महिन्यांत दुहेरी लॉकडाऊनचा केला सामना, गारपिटीने पीकही उद्ध्वस्त

काश्मीरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी कलम 370 आणि नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, गारपिटीने पीकही उद्ध्वस्त

काश्मीर खोऱ्याने ११ महिन्यांत तीन मोठी संकटे पाहिली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर लॉकडाऊन झाला होता. हिवाळ्यात एक महिन्यासाठी लॉकडाऊन उघडला, मात्र मार्चमध्ये कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन झाला. तिसरे संकट गारपिटीने आले. नोव्हेंबर, एप्रिल, मे आणि जूनमध्ये गारपीट झाली, यामुळे सफरचंद, चेरी आणि पाम पीक उद्ध्वस्त झाले. मात्र या वेळी पाऊस चांगला आणि वेळेवर सुरू झाला आहे. यामुळे केशराचे पीक चांगले येण्याची अपेक्षा आहे. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शेख अहमद सांगतात की, ही स्थिती खोऱ्यात शक्यतो पहिल्यांदाच आहे. ऑगस्टपासून डिसेंबरदरम्यानच्या लॉकडाऊनमुळे १८ हजार कोटींचे नुकसान झाले. सुमारे पाच लाख नोकऱ्या गेल्या. जानेवारी ते जूनमध्येही १८ हजार कोटींचे नुकसान झाले. म्हणजे ११ महिन्यांत ३६ हजार कोटी रुपये. या वेळी हवामानाने सोबत केली नाही. पिकांवर संकट होते. 

न्यू काश्मीर फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष मोहंमद यासिन भट्ट यांनी सांगितले की, काश्मिरात सफरचंद, पाम आणि डबल चेरी पिकते. या वेळी नुकसान झाले. लॉकडाऊनपेक्षा जास्त नुकसान वातावरणाने केले. श्रीनगरचा पारिम्पोरा भाजी आणि फळबाजार आशियातील दुसरा मोठा बाजार आहे. येथे सुमारे २७० व्यापारी आहेत. यातील १२० जणांकडे काम राहिले नाही. सफरचंदाचे सुमारे ४०% पीक नोव्हेंबरमध्ये गारपिटीने खराब झाले. या वेळी सफरचंद ३०% महाग होऊ शकते. आता काही शेतकऱ्यांवर शेती विकण्याची वेळ आली आहे. गारपिटीने अक्रोड आणि बदामाचे पीकही नष्ट झाले. खोऱ्यातील ड्रायफ्रूटचे मोठे व्यापारी हिलाल अहमद मीर सांगतात की, यंदा उत्पन्न कमी आणि महाग असेल. डबल चेरीचे उत्पन्न तीन लाख किलो येते, मात्र या वेळी उत्पादन कमी आहे आणि मागणीही नाही. मुंबईतूनच २५ टन चेरीची मागणी असते, मात्र या वेळी ५ टन मागणी आली आहे. चेरी प्रॉडक्ट करणाऱ्या श्रीनगरच्या दोन डझनांपेक्षा जास्त कंपन्यांपैकी केवळ तीनमध्येच काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे पश्मिना शॉल व्यवसायालाही नुकसान झाले आहे.

असहायता:५०० शिकारे विकले, बोट हाऊसवरही संकट

दल  सरोवरात सध्या ४८८० शिकारे आणि ९१० बोटी आहेत. डबल लॉकडाऊनने पर्यटक आले नाहीत, यामुळे शिकारे बंद आहेत. एक शिकारा जवळपास ३ लाखांचा असतो. आर्थिक असहायतेमुळे ५० ते ८० हजारांत शिकारा विकावा लागला. आतापर्यंत ५०० शिकारे विकले गेलेत. हीच स्थिती हाऊसबोट चालकांचीही आहे.

एकच आशा: ३ टन जास्त केशर उत्पादन होऊ शकते

जाफरान असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल मजिद सांगतात की, गेल्या वर्षी पूर्ण काश्मिरात अडीच अब्ज रुपयांचे १७ टन केशर झाले होते. या वेळी पाऊस चांगला आणि वेळेवर झाला आहे. यामुळे २० टनांपेक्षा जास्त केशर उत्पादन होऊ शकते. मात्र, केशर बाजार इराण खराब करत आहे. यामुळे आमचे नुकसान होते.

श्रीनगरहून ६० किलोमीटर अंतरावरील सिथारन गाव पीरपंजाल पहाडांनी वेढले आहे. हा परिसर दहशतवादी कारवायांचे केंद्र राहिला आहे. मात्र गावातील तरुण दहशतीला चेंडू व बॅटने उत्तर देत आहेत. गेल्या ११ महिन्यांत पहिल्यांदाच येथे स्पर्धा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...