आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kashmir Zone Police: Two Local Terrorists Of Lashkar e Taiba Surrendered On Appeal Of Families

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:कुलगाममध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण, कुटुंबियांच्या आवाहानानंतर दोघांची शरणागती

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक होत असल्याचे समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये डीसीसी निवडणूकांच्या निकालांदरम्यान, कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी लष्कर-ए-तोएबाच्या दोन स्थानिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. कुटुंबियांननी आवाहान केल्यानंतर या दोघांनी आत्मसमर्पण केले आहे. या दोन्ही दहशतवाद्यांकडून पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दारूगोळा जप्त केला आहे.

सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक होती. याच वेळी या दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. येथे दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना विनवणी केली. यानंतर त्यांनी सैन्यापुढे शरणागती पत्करली आहे. तसेच हे दोन्हीही दहशतवादी स्थानिकच आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक होत असल्याचे समोर येत आहे. 13 डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तीन दहशतवाद्यांचा एक गट शोपियांकडे सीमा ओलांडत होते तेव्हाच ही चकमक झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser