आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmiri Pandit Workers In Double Dilemma: Pressure To Return To Work, Threat Of Militants

ग्राउंड रिपोर्ट:काश्मिरी पंडित कर्मचारी दुहेरी संकटात : एकीकडे कामावर परतण्याचा दबाव, दुसरीकडे अतिरेक्यांच्या धमकीचे सावट

जम्मू / मोहित कंधारी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कामावर न परतल्यास पगार थांबवण्याची कर्मचाऱ्यांना धमकी

खोऱ्यात तैनात काश्मिरी पंडित कर्मचारी सध्या दुहेरी धमक्यांचा सामना करत आहेत. या लोकांनी खोऱ्यात शासकीय नोकरीची जोखीम स्वीकारली, मात्र जेव्हापासून अतिरेक्यांनी बाहेरच्या लोकांना लक्ष्य करून हत्या सुरू केल्या, त्यातील बहुतांशी मूळ गावात परतले आहेत. अधिकारी आता कर्मचाऱ्यांवर खोऱ्यात परतून नोकरी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. दुसरीकडे, या लोकांना खाेऱ्यात परतल्यानंतर अतिरेक्यांच्या हाताने मारले जाण्याची भीती आहे. ७ ऑक्टोबरला अतिरेक्यांनी महिला प्राचार्य आणि शिक्षकांना शाळेत घुसून गोळ्या घातल्या होत्या. एका पाठोपाठ एक दहापेक्षा जास्त बिगर काश्मिरी कामगारांना लक्ष्य केले. यामुळे खोऱ्यात भीतीचे वातावरण बनले आणि अल्पसंख्याक, विशेषत: काश्मिरी पंडित समुदायाचे कर्मचारी जम्मूत परतले.

या लाेकांना शासकीय याेजना व पॅकेज अंतर्गत खोऱ्यात नोकरीसाठी राजी केले होते. तेथे त्यांना कडक सुरक्षेतील शिबिरात राहण्याची सोय करण्यात आली. आता शिबिरे रिकामी आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने सुरक्षा चोख ठेवण्यासाठी अनेक पावले टाकली, तरीही पंडितांमध्ये विश्वास निर्माण होत नाहीये. सध्या कोणीही परतण्यास तयार नाही. शासकीय सूत्रांनुसार ताज्या घटनांनंतर जे बिगर काश्मिरी कर्मचारी गेले त्यातील थोडेच परतले. परतलेल्यांमध्ये अभियांत्रिकीचे लोक जास्त आहेत. शिक्षक कोणीही नाही. अनंतनागमध्ये कार्यरत शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, आमच्यावर अधिकाऱ्यांचा दबाव आहे. शिक्षणाधिकारी सतत फोनवरून कामावर परतण्याचे सांगत आहेत. सुरक्षा वाढवल्याचे सरकार सांगते, मात्र कामाच्या ठिकाणी संरक्षण कसे मिळेल? काही शिक्षकांनी सांगितले की, त्यांना खोऱ्यात परतल्यानंतर बघून घेण्याची धमकी अतिरेकी देत आहेत. अशा स्थितीत आम्ही कसे परतणार?

दहावी-बारावीची परीक्षा, शाळांमध्ये नाहीत कर्मचारी
शिक्षण विभागासमोर नवी समस्या उभी झाली आहे. ९ नोव्हेंबरपासून स्टेट बोर्डाची इयत्ता दहावीची तर २० तारखेपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. यासाठी खोऱ्यात विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. यावर काही काश्मिरी पंडित शिक्षकांनी सांगितले की त्यांनी ऑक्टोबरमध्येच संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आता केवळ परीक्षा बाकी आहेत.

कामावर न परतल्यास पगार थांबवण्याची कर्मचाऱ्यांना धमकी
स्थिती सामान्य होईपर्यंत आमची रजा धरा अशी विनंती खोरे सोडण्यापूर्वीच अधिकाऱ्यांना केली होती, असा दावा शिक्षकांनी केला आहे. तरीही नोटिसा पाठवल्या आहेत. एकाने सांगितले की “आम्ही ड्युटीवर परतलो नाही तर पगार रोखला जाईल, असा इशारा आम्हाला दिला गेला आहे.”

बातम्या आणखी आहेत...