आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmiri Pandits Are Not Ready To Leave Their Homeland Despite Constant Terror From Terrorists

दिव्य मराठी विशेष:अतिरेक्यांकडून होणाऱ्या सततच्या दहशतीनंतरही जन्मभूमी सोडण्यास तयार नाहीत काश्मिरी पंडित

हारुण रशीद | श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरी पंडितांच्या हत्यांमुळे समुदायातील इतर लोकांत दहशत आहे. ज्यांनी 1990 च्या दशकात धोकादायक स्थितीचा सामना केला व कधीच खोरे सोडले नाही असे पंडित सर्वाधिक दहशतीत आहेत. संघर्ष समितीच्या मते, खोऱ्यातील सुमारे 800 पंडित कुटुंबांनी कधीच काश्मीर सोडले नाही. ही कुटुंबे तीन दशकांपासून न घाबरता इथेच राहिली. कुमार वांचू हे पंडित तीन दशकांपासून श्रीनगरमधील जवाहरनगरात राहतात. या भागात एकेकाळी काश्मिरी पंडितांची संख्या मोठी होती, परंतु 90च्या दशकात वांचूसह काही कुटुंबे वगळता उर्वरित पंडितांनी खोरे सोडले. वडील हृदयनाथ वांचू यांच्या हत्येनंतरही कुमार यांनी काश्मीर सोडले नाही. कारण काश्मिरात राहून काम सुरू ठेवण्याचा त्यांनी दृढनिश्चिय केला होता.’

मारेकऱ्याची ओळख पटली
पोलिसांनी बुधवारी आदिल वाणी नावाच्या अतिरेक्याची मालमत्ता जप्त केली. त्यानेच एक दिवस आधी शोपियान येथील सफरचंदाच्या बागेत सुनील कुमार भटची हत्या केली. तो अतिरेकी संघटना अल-बद्रशी संबंधित आहे. त्याचे वडील व तीन भावंडांनाही अटक केली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कुमार म्हणाले, वाणी व त्याच्या साथीदाराला अटक केली जाईल किंवा ठार मारले जाईल.

स्थिती बदलली - पंडित
उत्तर काश्मिरात राहणारे एक पंडित म्हणाले, ‘एकेकाळी काश्मिरात शेकडो अतिरेकी होते. घराबाहेर पाहत होतो तेव्हा अनेक बंदूकधारी अतिरेकी दिसत, पण आम्हाला कुणी स्पर्शही केला नाही. ते आम्हाला आणि आम्ही त्यांना ओळखत होतो. आता स्थिती बदलली आहे. आता बंदूकधारी माणूस कोण आहे, हेच कळत नाही. पोलिस म्हणतात, हल्लेखोर तरुण कधीच पंडितांच्या बाजूने नव्हते. त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

परप्रांतीयांची नावे मतदार यादीत
जम्मू-काश्मिरात कामानिमित्त राहणारे लोकही विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे काश्मिरात नवा वाद निर्माण झाला आहे. आयोगाच्या मते, यामुळे केंद्रशासित प्रदेशात 25 लाख नवे मतदार जोडले जातील. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर नावे जोडण्याची कसरत पहिल्यांदा केली जात आहे. हे काम 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. काश्मिरमधील सर्व राजकीय पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा मतांचे संतुलन राखण्याचा भाजपचा हातखंडा असल्याचे या पक्षांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...