आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमेवर मलम:आता सुरक्षित भागातच तैनात होणार काश्मिरी पंडित... परंतु पलायन सुरू, केंद्रशासित प्रशासनाचा काश्मिरी पंडितांना दिलासा

श्रीनगर/जम्मूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मिरी पंडितांची मोठी मागणी मान्य केली आहे. सरकारने पंतप्रधान विशेष पॅकेजअंतर्गत येणारे काश्मिरी यात्रेकरू आणि इतर कर्मचाऱ्यांना ६ जूनपर्यंत काश्मिरातील ‘सुरक्षित’ जागी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पहाटे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काश्मीर विभागात तैनात अल्पसंख्याक समुदायातील पीएम पॅकेज मधीलकर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणांवर तैनात करण्याची प्रक्रिया ६ जूनपर्यंत पूर्ण केली जाईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ४५०० स्थलांतरित कर्मचारी जिल्हा किंवा नगरपालिकांमध्ये कार्यरत आहेत. मागील आठवड्यात ५०० कर्मचाऱ्यांची बदली केली. यात १०० दांपत्ये आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अतिरेक्यांनी शेपियां जिल्ह्यातील राख-ए-चिद्रेन भागात एका नागरिकाला गोळी मारली. त्याच्या पायाला जखम झाली असून त्यास रुग्णालयात भरती करण्यात आले. या नागरिकाची ओळख फारूक अहमद शेख या नावाने पटली आहे.

-गृहमंत्री शहा उद्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ जून रोजी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतील. बैठकीत केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारीही सहभागी होतील.

३०० पैकी अर्धी कुटुंबे जम्मूला रवाना; हिंदू कर्मचारी म्हणाले, आम्हाला बाहेर जाण्याची परवानगीही नाही दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनाने आमच्या सुरक्षेसाठी काहीही न केल्याचा आरोप करत अनेक काश्मिरी पंडित कुटुंबे बुधवारी जम्मूला रवाना झाली. हिंदू महिला शिक्षिकेच्या हत्येनंतर जम्मूला स्थलांतरित करण्याचा २४ तासांचा अल्टिमेटम पंडितांनी प्रशासनाला दिला होता. बारामुल्लात पंतप्रधान विशेष पॅकेजअंतर्गत काम करणारे अनिल म्हणाले, इथे काश्मिरी पंडितांची ३०० कुटुंबे आहेत. आमचा अल्टिमेटम बुधवार सायंकाळी ७ वाजता संपणार होता, पण काही कुटुंबे भीतीने आधीच निघाली. १५० कुटुंबे जम्मूला रवाना झाली. आम्ही फर्निचर, इन्व्हर्टर व अन्य वस्तू विकत आहोत, पण अर्धी किंमतही मिळेना. तथापि, सरकारी निर्वासित छावण्यांत राहणाऱ्या हिंदू कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर निघू न देण्याचा आरोप लावला आहे. गांदरबल, बडगाम, श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमधील पंडितांचे म्हणणे आहे, जी कुटुंबे जम्मूला रवाना झाली ती खासगी किंवा भाड्याच्या घरात राहत होती.

बातम्या आणखी आहेत...