आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kashmiri People Lose Faith In Democracy, Shiv Sena Also Questions 370: Farooq Abdullah

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर:काश्मिरी लोकांचा झाला लाेकशाहीवरील विश्वास कमी, शिवसेनाही 370 वर प्रश्न करतेय : फारूक अब्दुल्ला

श्रीनगर / मुदास्सिर कुल्लू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व नेत्यांची सुटका हाेईल तेव्हा आम्ही आमचा अजेंडा मांडू. सध्या काहीही सांगता येणार नाही, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी भूमिका मांडली. ते ‘भास्कर’शी बाेलत हाेते. आमच्या नेत्यांना बेकायदा ताब्यात ठेवण्यात आले आहे. यासंबंधी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईश्वराच्या इच्छेमुळे एक वर्षानंतर अनेक नेत्यांना घरी परतण्याची परवानगी मिळाली. मी इतर नेत्यांना फाेन करून ते मुक्त झाले किंवा नाही, याची चाैकशी करणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार एक राजकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आम्ही माेकळेपणाने फिरू शकताे. आमच्या नेत्यांवर असे निर्बंध टाकले जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने ३७० हटवल्यानंतर देशभरात अनेक लाेकांनी आवाज उठवला, असे फारूक यांनी सांगितले. ते म्हणाले, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, शरद पवार व सीताराम येचुरी यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. एवढेच नव्हे तर शिवसेनेने देखील भाजपला ३७० हटवून तुम्हाला काय मिळाले? असा प्रश्न केला आहे. काश्मीर खाेऱ्यात अन्याय झाला आहे, असे देशभरातून म्हटले जाते. काश्मीरमध्ये घडलेल्या घटनाक्रमामुळे आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही जम्मू-काश्मीरमधील लाेकांच्या समस्या जाहीरपणे मांडू इच्छिताे. राज्यात संपन्नता यावी, असे आम्हाला वाटते. सर्वांची सुटका हाेईल तेव्हा आम्ही बैठक घेऊ. त्यात राजकीय अजेंडा निश्चित करू. ३७० हटवल्यानंतरच्या परिस्थितीबाबत अब्दुल्ला म्हणाले, खाेऱ्यात काय घडले हे सर्वांना ठाऊक आहे.