आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kaushambi (UP) Road Accident Latest Updates। Truck Overturned On Scorpio Returning From Wedding Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवर ट्रक उलटला, 8 वऱ्हाड्यांचा मृत्यू:उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये झाला अपघात, जीव गमावणाऱ्यांमध्ये तीन कुटुंबातील सहा महिला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांमध्ये तीन कुटुंबातील सहा महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. येथे वऱ्हाड्यांचा घेऊन परतत असलेल्या कारवर वाळूने भरलेला ट्रक पलटी झाला. यात कारच्या चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन कुटुंबातील सहा महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. गाडीत 10 जण होते. कारमधून दोन जणांनी उडी मारून आपला जीव वाचवला. त्यांना दुखापत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कारमधील प्रवासी हे शहजादपुरवरुन परतत होते. कडाधाम कोतवाली परिसरातील देवीगंज चौकाजवळ ड्रायव्हरने काही कामासाठी कार रस्त्याच्या बाजुला थांबवली. त्यावेळी तेथून जात असलेला वाळूने भरलेला ट्रक गाडीवर उलटला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे आणि जखमींवर योग्य उपचारांचे आदेश दिले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser