आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणा CM केसीआर यांची मुलगी कविता यांचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील एक दिवसाचे उपोषण संपले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत AAP, अकाली दल, PDP, TMC, JDU, NCP, CPI, RLD, NC आणि समाजवादी पक्षासह 17 पक्षाचे नेते उपस्थित होते.
महिला आरक्षण गरजेचे असून ते लवकरात लवकर आणावे. जोपर्यंत हे विधेयक येणार नाही. तोपर्यंत आंदोलन करत राहणार. हे विधेयक देशाच्या विकासात मदत करेल, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलन करण्याची परवानगी दिली नव्हती. यावर कविता म्हणाल्या की, आधी परवानगी दिली होती. मात्र, नंतर रद्द करण्यात आली. मी या प्रकरणी पोलिसांशी बोलणार आहे.
कविता म्हणाल्या - विधानसभेत महिलांसाठी 33% आरक्षण असावे
कविता म्हणाल्या की, गेल्या 27 वर्षांपासून महिला आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सरकारे बदलली पण, विधेयकला मंजुरी मिळाली नाही. लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण असावे. यासाठी आम्ही आमचा लढा सुरुच ठेवणार आहोत. भाजपने 2014 आणि 2019 निवडणुकादरम्यान महिला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण, त्यावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही.
मद्य धोरण प्रकरणात कविता यांची 11 मार्चला ED कडून चौकशी
दिल्ली मध्य धोरण प्रकरणात EDने 11 मार्चला कविता यांना चौकशीसाठी बोलावले आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, असा आरोप कविता यांनी केला. जेथे निवडणुका असतात, तिथे मोदींच्याही आधी ईडी पोहचते.
कविता पुढे म्हणाल्या की, जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ED समोर हजर होण्यासंदर्भात आपल्या कायदा सल्लागाराशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी तपासात पुर्ण सहयोग करेल. 12 डिसेंबर 2022 रोजी कविता यांची CBI हैदराबाद येथे 7 तास चौकशी झाली होती.
कविता यांचा विश्वासू ईडीच्या ताब्यात
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडी मनी लाँड्रिंग तक्रारींची चौकशी करत आहे. मंगळवारी दिल्लीच्या एका कोर्टाने हैदराबाद येथील व्यवसायी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना 13 मार्चपर्यंत EDच्या ताब्यात दिले आहे. अरुण हे कविता यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते. मद्य धोरण घोटाळ्यात बदल करण्यासाठी आम आदमी पक्षाला पिल्लई यांनी 100 कोटी दिले होते. तसेच कोर्टाने आणखी एक व्यवसायीक अमनदीप ढल यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
ED चा आरोप आहे की, कविता या 'साउथ कार्टेल’चा भाग आहे. ज्यांनी लाच देऊन मद्य धोरण घोटाळ्यात बदल केला होता. नायब राज्यापाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे CBI चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर धोरण वापस घेण्यात आले. ED आणि CBI या दोन्हींनी आरोप केला आहे की, 'साउथ कार्टेल’लॉबीसे लाच घेतल्याने मद्य धोरण करताना नियम मोडण्यात आले. साउथ कार्टेलमध्ये कविता, मगनुनता श्रीनिवासलु रेड्डी, आंध्र प्रदेशचे वायएसआरसीपीचे एक खासदार सहभागी होते.
सिसोदिया 17 मार्चपर्यंत ED च्या ताब्यात
दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी अटकेत असेलेल मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 21 मार्चला सुनावणी होणार आहे. तर ईडीला सिसोदिया यांची 7 दिवसांची (17 मार्च) कोठडी दिली आहे. ईडीने सिसोदिया यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती.
ED दुपारी 2 वाजता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहचली होती. आतापर्यंत दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणात आणखी 7 जणांना नोटीस पाठवले आहे. सिसोदिया यांच्या समोरा-समोर बसून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सिसोदिया यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्याचे ईडीने म्हटले होते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.