आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे रद्द झालेले अबकारी धोरण प्रकरण:ईडीच्या दोषारोपपत्रात केसीआर यांची मुलगी, सिसोदियांचे नाव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अबकारी धोरण प्रकरणी राऊज अॅव्हेन्यू विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची मुलगी के. कविता, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे खासदार संजय सिंह यांचेही नाव आहे. दक्षिणेतील ज्या ग्रुपने रद्द झालेल्या अबकारी धोरणांतर्गत लाभ मिळवण्यासाठी दिल्ली सरकारच्या नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिली होती त्या ग्रुपची कविता ही सदस्य असल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, कविताने हे आरोप फेटाळले आहेत. इंडो स्पिरिट्स नावाच्या कंपनीने अबकारी धोरणांतर्गत ठोक परवाना मिळवला. अरुण पिल्लईने कंपनीत ३.४ कोटी रुपयांची गुंतवणूक करत ३२.३६ कोटींचा नफा कमावला. कविताने पिल्लईच्या माध्यमातून ३२.५ टक्के भागीदारी मिळवली.

बातम्या आणखी आहेत...