आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा:'दोष’दूर होताच मुलाला सत्ता देण्याची तयारी, केसीआर मुलाच्या वाढदिवशी भेट म्हणून देऊ शकतात सीएम पद

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे त्यांचे पुत्र के. टी. रामाराव (केटीआर) यांना मुख्यमंत्र्याची खुर्ची सोपवू शकतात. केटीआर वडिलांच्या सरकारात मंत्री असले तरी त्यांचा रुबाब मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आहे. ते २४ जुलैला ४५ वा वाढदिवस साजरा करतील आणि भेट म्हणून वडिलांकडून त्यांना सीएमची खुर्ची मिळू शकते असे म्हटले जात आहे. या काळातच सचिवालय भवनात काम सुरू होईल, यामुळेही शक्यता वाढली आहे. केसीआर यांची ज्योतिष व वास्तूमध्ये श्रद्धा आहे. त्यांच्या वास्तू सल्लागारांनी सांगितले होते की, जुन्या सचिवालयात “दोष’ असल्यानेच त्यांना मुलाला मुख्यमंत्री करता येत नाहीये. यानंतर नव्या सचिवालयाचे बांधकाम सुरू झाले.

दुसरीकडे केसीआर यांनी सत्ता हस्तांतरण नाकारले असले तरी राजकीय विश्लेषक आणि त्यांचाच पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांना वाटते की, कधी ना कधी तर ते मुलाला खुर्ची सोपवतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे केसीआर सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसत आहेत. वेळेवर त्यांनी पक्ष आणि सत्तेचे नेतृत्व मुलाला दिले नाही तर पक्षात फूटही पडू शकते, असे त्यांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...