आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे आदेश:केदारनाथ आणि यमुनोत्री यात्रा थांबली

डेहराडूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरांत हिमवृष्टी व मैदानी भागात पाऊस होत असल्याने तापमान घसरले. केदारनाथमध्ये मंगळवारी हिमवृष्टीतही भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले. तथापि, नंतर खबरदारी म्हणून केदारनाथ व यमुनोत्रीची यात्रा स्थगित करण्यात आली. सुमारे १० हजार प्रवाशांना रस्त्यातच रोखले. केदारनाथमध्ये तापमान शून्याहून उणे ५ अंश सेल्सियस राहिले. थंडी व ऑक्सिजनच्या कमतरतेने आतापर्यंत ६५ चारधाम भाविकांचा मृत्यू झाला.

भाविकांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे प्रशासनाचे आदेश
केदारनाथमधील हवामान बिघडल्याने भाविकांना पुढे जाण्यापासून रोखले जात आहे. प्रशासनाने भाविकांना जेथे आहात तेथेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. हवामानात सुधारणा आणि पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित असेल.

बातम्या आणखी आहेत...