आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट:केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, कोरोना काळात प्रथमच भाविकांना बाबांचे दर्शन

केदारनाथ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आतूर भाविकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 6 महिन्यांनंतर बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी 6.25 ला उघडण्यात आले. यावेळी वैदिक मंत्रोच्चारांसह मंदिराचे मुख्य पुजारी रावल यांनी बाबा केदारनाथांच्या पालखीसह मंदिरात प्रवेश केला. यावेळी तब्बल 10 हजार भाविक व उत्तरांखडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीदेखील उपस्थित होते. 2020 मध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून भाविकांना येथे दर्शन घेण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता ही परवानगी देण्यात आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

केदारनाथ विश्व कल्याणासाठी 6 महिने समाधीत असतात,असे मानले जाते. दार बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी सव्वा क्विंटल भस्म अर्पण केले जाते. दार उघडल्यानंतर बाबा समाधीतून जागे होतात, अशी भावना आहे. आजच्या सोहळ्यासाठी बाबा केदारनाथ मंदिराचे प्रांगण 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. बाबांच्या दर्शनासाठी गुरुवारीच केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी झाली होती.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याने आता 12 हजार भाविक महादेवाचे दर्शन घेऊ शकतील.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याने आता 12 हजार भाविक महादेवाचे दर्शन घेऊ शकतील.

गौरीकुंड येथून केदारनाथला जाण्याची भाविकांना परवानगी
गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे 21 किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने कापत केदारनाथ धाम गाठले. सकाळी 6 वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी 4 वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे हजारो भाविकांना गौरीकुंडावर थांबवण्यात आले. , शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.

भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने भाविकांना गौरीकुंड येथेच रोखण्यात आले होते.
भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने भाविकांना गौरीकुंड येथेच रोखण्यात आले होते.

शैव लिंगायत विधीने होणार पूजा
बाबा केदारनाथचे मंदिर भारतीयांसाठी केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर उत्तर आणि दक्षिण भारताच्या धार्मिक संस्कृतीच्या संगमाचे स्थळही आहे. उत्तर भारतात पूजा पद्धती भिन्न आहे. मात्र, बाबा केदारनाथमध्ये पूजा दक्षिणच्या वीर शैव लिंगायत विधीने होते. मंदिराच्या गादीवर रावल(पुजारी) असतात. त्यांना प्रमुखही संबोधतात. हे कर्नाटकशी संबंधित असतात.

केदारनाथ मंदिराला 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.
केदारनाथ मंदिराला 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

आदिगुरू शंकराचार्यांनी बांधले आहे मंदिर
उत्तराखंडच्या चार धामांमध्ये केदारनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाभारत काळात शिव महादेवाने पांडवांना येथे दर्शन दिले होते. त्यामुळे आदिगुरू शंकराचार्यांनी येथे हे मंदिर बांधले. हे मंदिर सुमारे 3,581 चौरस मीटरच्या उंचीवर असून गौरीकुंडपासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे. हे मंदिर आदिगुरु शंकराचार्यांनी ८व्या-९व्या शतकात बांधले होते असे मानले जाते.

हॉटेल फुल्ल, भाविकांसाठी निवासाची सोयही नाही!
बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आतूर भाविकांचा जनसागर एक दिवस आधीच येथे विसावला आहे. या तिर्थस्थळाच्या हॉटेल-धर्मशाळेची जवळपास १० हजार भाविकांची क्षमता आहे. मात्र, गुरुवारी २० हजार भाविक दाखल झाले. हजारो भाविकांकडे निवास आणि भोजनाचीही व्यवस्था नाही. आता तंबूही मिळत नाहीत. क्षमतेपेक्षा जास्त भाविक पोहोचल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हॉटेलांतील खोल्यांचे भाडे १०-१२ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. ज्यांना खोल्या मिळाल्या नाहीत, त्यांना उघड्यावर रात्र घालवणे भाग पडत आहे.

प्रशासनाची व्यवस्था तोकडी, भाविकांचे हाल
केदारनाथमध्ये प्रशासनाने भाविकांसाठी केलेली व्यवस्था तोकडी पडली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडही बनवले नाहीत. मोबाइल नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नाही. ही गैरसोय पाहता प्रशासनाने अखेर भाविकांना गौरीकुंडमध्ये त्यांना रोखण्याचा निर्णय घेतला. गढवाल विभागाचे आयुक्त सुशीलकुमार शर्मा यांनी सांगितले की, केदारनाथ धाममध्ये नियोजनाशिवाय येणाऱ्या लोकांना अडचण येत आहे.गर्दी खूप जास्त आहे. त्यामुळे जोवर येथील जत्थे परत जात नाहीत, तोवर पुढील जत्थे गौरीकुंडमध्ये रोखले जातील. दुसरीकडे, मोठ्या गर्दीमुळे वाहनांनाही सोनप्रयागहून पुढे जाऊ दिले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...