आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kedarnath Temple: Uttarakhand Kedarnath Latest News: Snow Clearing Operations Underway

केदारनाथ मंदिर:लॉकडाउनदरम्यान सुरू झाली यात्रेची तयारी; केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी बर्फातून तयार होत आहे रस्ता

केदारनाथ3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 95 जणांची टीम 3 हजार 553 मीटर ऊंचीवर 1 मार्चपासून काम करत आहेत

केदारनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान मंदिरापर्यंत जाण्यासाठी बर्फातून रस्ता तयार करण्यात येत आहे. या कामातही सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात आहे. भीम बलीपासून केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी 9 किमोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे. आता 95 जणांची टीम हा बर्फ काढण्याचे काम करत आहेत. परंतू, एका दिवसात फक्त तिनशे मीटरचा रस्ताच साफ होत आहे. 1 मार्चपासून हा रस्ता बनवण्याचे काम सुरू होते. हे काम 20 एप्रिलपर्यंत पुर्ण होईल. केदारनाथ मंदिराची दारं 29 एप्रिलपासून उघडणार आहेत.

7 फूट खोल बर्फ, ग्लेशियर वितळत आहेत
बर्फ हटवण्याच्या कामात असलेल्या वुडस्टोन कंस्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर मनोज सेमवालने भास्करशी बातचीतदरम्यान सांगितले की, सध्या वातावरण खूप खराब आहे, यामुळे खूप बर्फ जमला आहे. सध्या ज्या रस्त्यांना साफ करण्याचे काम सुरू आहे, त्या रस्त्याच्या तीन फूट खोल बर्फ जमला आहे. मंदिराजवळतर 7 फूट खोल बर्फ पडला आहे. कोणतीच मशीन या ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणून हातानेच मजुरांना काम करावे लागत आहे. यामुळे रोज फक्त तिनशे मीटरचा रस्ताच साफ होत आहे.

रात्री मायनस 3 डिग्री टेम्प्रेचर, दिवसा 12 डिग्री
केदारनाथमध्ये रात्री मायनस 3 डिग्री आणि दिवसा 12 ते 15 डिग्री तापमान आहे. आर्मीतून रिटायर झालेल्या तीन जवानांनी मिळून ही कंस्ट्रक्शन कंपनी सुरू केली होती. हे लोक आधी नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगचा भाग होते. मनोज सेमवालने सांगितले की, मागील पाच वर्षांपासून आम्ही केदारनाथमध्येच राहतो. या कंस्ट्रक्शन कामात नेपाळ, उत्तराखंड आणि यूपीचे लोक आहेत. एका लेबरला 18 हजार रुपये प्रति महिना आणि त्यांच्या खान्यापिण्याची संपूर्ण सोय कंपनीकडून केली जाते.

29 एप्रिलपासून सुरू होईल दर्शन, दरवर्षी 25 हजार भाविक दर्शनसाठी येतात
यावर्षी केदारनाथ मंदिराचे कपाट 29 एप्रिलपासूनस सुरू होतील. 29 एप्रिलला सकाळी 6.30 वाजेपासून दर्शनाला सुरुवात होईल. हे दर्शन नंतर नोव्हेंबरपर्यंत चालेल. दुपारी 3-5 दरम्यान मंदिराचे कपाट बंद केले जातात. संध्याकाळी 5-7.30 मंदिर सुरू राहते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...