आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kedarnath Yatra Route Is Jammed For The First Time This Year Due To Foot Pilgrims | Marathi News

चारधाम:केदारनाथचा यात्रा मार्ग पायी यात्रेकरूंमुळे यंदा प्रथमच जाम, 1 महिन्यातच 14 लाख प्रवासी

डेहराडूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारधाम यात्रेत या वेळी भाविकांचे मागील सर्व विक्रम मोडीत निघत आहेत. एका महिन्यात १४ लाखांपेक्षा जास्त भाविक पोहोचले आहेत. ७ महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत ३४ लाख भाविकांचा विक्रम आहे. २०१९ मध्ये तो झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षांपर्यंत केवळ सांकेतिक यात्रा झाली होती. यात्रा ऑक्टोबरपर्यंत चालते.

पहिल्यांदाच केदारनाथ धामच्या रस्त्यात पायी जाणाऱ्या यात्रेकरूंचाही जाम झाला आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम यात्रेच्या नोंदणीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे, अनेक लोकांना धामांवर थांबण्यासाठी हॉटेल वा होमस्टेत बुकिंग मिळत नाही. प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे की, राहण्याची व्यवस्था होत नसेल तर यात्रा टाळली पाहिजे. यामुळे यात्रेतील संभाव्य त्रास होणार नाही. उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी सांगितले की, या वेळी यात्रेकरूंचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. चारधाम, हेमकुंडमध्ये यात्रेकरूंनी घेतलेले दर्शन केदारनाथ 4,52,567 बद्रीनाथ 4,87,532 गंगोत्री 2,61,861 यमुनोत्री 1,93,953 हेमकुंडसाहिब 20,775 एकूण14,16,688

हजारो कुटुंबांसाठी यात्रा आशादायक; या वर्षी ३० हजार लोकांना मिळाला रोजगार

ऋषिकेशहून चारधामसाठी रोज हजारो वाहनांतून सुमारे ५० हजार यात्रेकरू रवाना होत आहेत. यामुळे दोन वर्षांपासून बेरोजगारीच्या झळा सोसणाऱ्या हजारो चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. उत्तराखंड पर्यटन विभागानुसार, यात्रा मार्गावर ५ हजारांपेक्षा जास्त व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यात ढाबे, हॉटेल, होम स्टे, डिपार्टमेंटल स्टोअर, मेकॅनिक आदी असतात. एकूण ३० हजार लोकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे दोन वर्षांत हे सर्व ठप्प होते. काही कुटुंबे मूळ गाव सोडून शहरांत मजुरी करण्यासाठी आली होती. आता ती परतली आहेत. देवप्रयागपासून २० किमी अंतरावर ढाबा चालवणारी मृदुलाकुमारी म्हणाली की, कोरोनामुळे वडिलांचे निधन झाले. दोन वर्षांपासून ढाबा बंद होता. आता मी तो सुरू केला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या लोकांची वाढती संख्या पाहता पाच अतिरिक्त स्टाफ ठेवावा लागला. याच पद्धतीने ४ वर्षांआधी मुकेश नौटियाल यांनी कमेडात ३० लाखांचे कर्ज घेऊन रेस्तराँ सुरू केले होते. कोरोनामुळे उत्पन्न शून्य झाले. १२ जणांचा स्टाफ होता. त्यांची नोकरी गेली होती. आता त्यांना बोलावले आहे.

चारधाम मार्गावरील अनेक गावांच्या रस्त्यांवर ढाबे सुरू झाले आहेत. रतुडा गावचे ढाबाचालक राजेंद्रप्रसाद म्हणाले, दिल्लीत दिलशाद गार्डन हॉटेलमध्ये काम करत होतो. आता गावी आलो आहे. आता शहरात जायची गरज पडणार नाही, असे वाटते. अशीच स्थिती मलेथा, व्यासी, कमेडा, नगरासू, घोलतीरमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...