आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAPचे मिशन गुजरात:केजरीवाल व भगवंत मान यांचा अहमदाबादेत रोड शो, केजरीवाल म्हणाले -'मी तर गुजरात व गुजरातींचे मन जिंकण्यासाठी आलो'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान विजय मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीने आता आपले लक्ष्य गुजरातकडे वळवले आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या गुजरातच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी अहमदाबादेत रोड शो केला. त्यात त्यांनी गुजरातच्या जनतेला राज्याची सेवा करण्याची संधी देण्याची विनंती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच राज्यात आव्हान देण्याचे आपले मनसुबे जाहीर केले. केजरीवाल यांनी यावेळी आपण येथे गुजरात व गुजराती भाषिक जनतेची मने जिंकण्यासाठी आल्याचेही स्पष्ट केले.

केजरीवाल व भगवंत मान यांचा रोड शो उत्तमनगर खोडियार मंदिरापासून सुरू होऊन बापूनगर ब्रिजवर संपला.
केजरीवाल व भगवंत मान यांचा रोड शो उत्तमनगर खोडियार मंदिरापासून सुरू होऊन बापूनगर ब्रिजवर संपला.
केजरीवालांनी साबरमती आश्रमात चरखा चालवून सूत कातले
केजरीवालांनी साबरमती आश्रमात चरखा चालवून सूत कातले
भगवंत मान यांनीही साबरमती आश्रमात चरखा चालवला.
भगवंत मान यांनीही साबरमती आश्रमात चरखा चालवला.

बातम्या आणखी आहेत...