आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल ऑटो चालकाच्या घरी करणार जेवण:एका गुजरातीने विचारले - तुम्ही माझ्या घरी डिनर करणार; दिल्लीचे CM तत्काळ झाले तयार

अहमदाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातच्या अहमदाबादमधील ऑटोरिक्षा चालकांच्या सभेला संबोधित केले. यावेळी एका चालकाने त्यांना आपल्या घरी रात्रीचे जेवण करण्याची विनंती केली. ती केजरीवालांनी तत्काळ मान्य केली. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या दोघांच्या संवादाचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओत ऑटो चालक केजरीवालांना रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित करताना दिसून येत आहे. तो म्हणाला - 'सर, माझे नाव विक्रम दत्तानी आहे. मी तुमचा फार मोठा प्रशंसक आहे. मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. त्यात तुम्ही पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी डिनर करताना दिसून येत आहात. मी गुजराती आहे. तुम्ही आज रात्रीचे जेवण माझ्या करी कराल का?'

त्यावर केजरीवाल म्हणाले - जरूर येईल. मी पंजाबच्या ऑटोवाल्याच्या घरी गेलो होतो. माझे पंजाबच्या ऑटो चालकांवर प्रेम आहे. मी गुजरातच्या ऑटो चालकांवरही प्रेम करतो. मी तुझ्याकडे जेवण्यासाठी येईल. पण माझी एक अट आहे. मला नेण्यासाठी तुला माझ्या हॉटेलपर्यंत ऑटो घेऊन यावा लागेल. माझ्यासोबत माझ्या पक्षाचे 2 सहकारी गोपाळ व इसुदानही रात्रीच्या जेवणासाठी येतील. रात्रीच्या जेवणासाठी 8 ची वेळ निश्चित करण्यात आली.

केजरीवालांनी ऑटो रिक्षा चालकाच्या समस्या ऐकल्या

या कार्यक्रमाद्वारे अरविंद केजरीवालांनी ऑटो चालकांच्या समस्याही ऐकल्या. ते म्हणाले - तुम्ही ज्या प्रकारे दिल्लीत आमची मदत केली. तशीच मदत गुजरातमध्ये विजय मिळवून देण्यासाठी करा.

केजरीवाल गुजरातच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते अहमदाबादमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या एका सभेलाही संबोधित करणार आहेत.

आपची निवडणुकीची जय्यत तयारी

गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. आपने यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांनी गुजरातच्या अनेक चर्चा केल्या आहेत. यावेळी केजरीालांनी महिला व बेरोजगार तरुणांसाठी भत्ते, गुणवत्तापूर्ण आरोग्य देखभाल व शिक्षण तथा 300 यूनिटपर्यंत मोफत वीज पुरवठ्यासह अनेक घोषणा केल्या.

बातम्या आणखी आहेत...