आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Keral Corona Virus Outbreak: Medical Teams Reach Villages On Foot Across The River; News And Live Updates

डॉक्टरांच्या जिद्दीसमोर वादळ थिटे:केरळात नदी ओलांडून वैद्यकीय पथके पायी पोहोचतात गावांत; संपर्क तुटलेल्या भागातही तपासणीसाठी डॉक्टर होताहेत दाखल

पलक्कड (केरळ)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. सुखान्या व त्यांच्या पथकाने गावात तपासणी केली. यात काहींमध्ये लक्षणे आढळली.

कोरोनाविरोधातील लढाईत डॉक्टरांचा रस्ता वादळही रोखू शकले नाही. यातीलच एक आहेत केरळच्या ४० वर्षांच्या महिला डॉक्टर के. ए. सुखान्या. तौक्ते वादळामुळे पलक्कड जिल्ह्यातील अट्टापदी जिल्ह्यात जंगलातील रस्ते उखडले. भवानी नदीही दुथडी भरून वाहत आहे. मात्र या वादळाला सुखान्या यांच्या पथकाला पश्चिम घाटातील जंगलातील मुरुगला आदिवासी वाडीवर जाण्यापासून रोखता आले नाही. त्यांच्यासोबत आरोग्य निरीक्षक सुनील वासू, सहायक निरीक्षक शाजू व चालक संजेशही होते. १७ किमी पायी चालून व नदी ओलांडून हे पथक तेथे पोहोचले. हा आमच्या कामाचा भाग असल्याचे सुखान्या सांगतात. आम्हाला नदीच्या जोरदार प्रवाहाचा सामना करत जावे लागले. अनेक ठिकाणी मानेपर्यंत पाणी होते.

गावापर्यंत रस्ता नसल्याने पूर्ण प्रवास थकवणारा होता. ३० किमीच्या प्रवासात १३ किमीच रुग्णवाहिकेतून जाता आले. बाकीचा प्रवास पायी व नदी ओलांडत केला. गावात जाऊन तपासणी केल्यावर सात जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली. त्यांना पुदूर येथील कोरोना सेंटरवर आणण्यासाठी खूप विनवण्या कराव्या लागल्या. अट्टापडी केरळमधील सर्वात मागास भाग आहे. त्याच्या सीमा तामिळनाडूतील कोइम्बतूर जिल्ह्याला लागून आहेत. या भागात दुसऱ्या लाटेत महामारीचा वेगाने प्रसार झाला. नोडल आरोग्य अधिकारी आर. प्रभुदास सांगतात की, वादळ व मुसळधार पावसामुळे दुर्गम आदिवासी वाड्यांपर्यंत जाण्यासाठी आरोग्य विभागाला परिश्रम घ्यावे लागत आहेत. तरीही डॉक्टर दुर्गम भागातील सर्व गावांमध्ये जात आहेत. तसेच दुर्गम भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर तैनात करण्यात आला आहे. या भागात कोरोनाबाबत जागरूकता नाही. लोक कोरोना प्रोटोकॉल ऐकतही नाहीत. येथील अनेक वनरस्ते असे आहेत, जे तामिळनाडूतील कोइम्बतूरपर्यंत जातात. या भागात नातेवाईक असल्याने लोक येत-जात राहतात. यामुळे संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...