आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमधील इडुक्की जिल्ह्यातील राजमालामध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच, 70 पेक्षा जास्त लोक अडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा भाग पर्यटन स्थळ मुन्नारपासून 25 किमी अंतरावर आहे.
ज्या ठिकाणी भूस्खलन झाले, त्या ठिकामी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची कॉलोनी होती. लँड स्लाइडमध्ये संपूर्ण परिसर वाहून गेला. यात मजुरांचे 20 पेक्षा जास्त घरे वाहुन गेले.
एक आवाज आला आणि सर्वकाही नष्ट झाले
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भूस्खलनावेळी एक मोठा आवाज झाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. या आपत्तीमधून वाचलेल्या दीपनने सांगितले की, भूस्खलनावेळी मी वडील, आई आणि पत्नीसोबत घरात होतो. संपूर्ण घर भूस्खलनात वाहून गेले.
केरळच्या अनेक भागात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजमालाला जोडणारा एक पुलही वाहून गेला आहे. यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पी विजयन यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. केरळचे महसूल मंत्री के चंद्रशेखरन यांनी सांगितले की, '4 लेबर कँपमध्ये 80 पेक्षा जास्त लोक राहत होते. घटनवेळी तिथे किती मजूर होते, याची माहिती मिळत आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, मजुरांना एअरलिफ्टही करण्यात अडचणी येत आहेत.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.