आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Affected 76% Of The Country, 32,000 Corona Patients In Three And A Half Months

कोरोना संकट:केरळमध्ये देशातील 76% बाधित, साडेतीन महिन्यांत 32 हजार रुग्ण; केरळचा परिणाम शेजारी राज्यांवरही

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत असलेले केरळ एकमेव राज्य आहे. केरळात एका दिवसातील रुग्णसंख्या ३२ हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशातील ७६ टक्के रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र मृतांत पुढे आहे. एका दिवसात सर्वाधिक १८३ मृत्यू नोंदवण्यात आले. बुधवारी देशात सुमारे ४६ हजार रुग्ण आढळले व ५०९ मृत्यू झाले. त्यापैकी ३२ हजार ६९४ रुग्ण एकट्या केरळात आढळून आल्याने प्रशासन चकित झाले. राज्यात १७३ जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्युदर १७.७६ आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. केरळच्या सर्व शहरांतील रुग्णसंख्येत वाढ झाली. चोवीस तासांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. अनेक वेळा केरळ उच्च न्यायालय,सुप्रीम कोर्टानेही राज्याला फटकारले आहे.

केरळचा परिणाम शेजारी राज्यांवरही
केंद्राने कोरोनासंबंधी वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे केरळमध्ये वारंवार उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याचा परिणाम केरळच्या शेजारी राज्यांवर दिसून येत आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर म्हणाले, राज्यातील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे विद्यार्थी केरळला जाऊन आले होते.

बातम्या आणखी आहेत...