आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kerala And Karnataka Are Likely To Have A Large Number Of IS Terrorists , Says UN

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूएनचा इशारा:केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयएसचे दहशतवादी असल्याची शक्यता

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयएसने मागच्या वर्षी भारतात नवीन राज्य ‘विलायाह ऑफ हिंद’ बनवण्याचा दावा केला होता

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शनिवारी इस्लामिक स्टेट (आयएस)च्या एका दहशतवाद्याला चकमकीनंतर अटक केली. त्याच्याकडून 2 आयईडी (इंप्रूव्ड एक्सप्लोसिव डिवाइस) आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. दहशतवादावर संयुक्त राष्ट्राने मागच्या महिन्यात एक रिपोर्ट जारी केली होती. यात इशारा देण्यात आला होता की, केरळ आणि कर्नाटकात मोठ्या संख्येने दहशतवादी असू शकतात.

जुन्या कमांडरच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या तयारीत

रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला होता की, भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल-कायदा (एक्यूआयएस)हल्ल्याचा कट रचत आहे. एक्यूआयएसचा आताचा कमांडर ओसामा महमूद आहे, यानेच ठार झालेल्या आसिम उमरची जागा घेतली आहे. उमरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. आयएसला मदत करणाऱ्या देशाने सांगितले की, भारतीय उपमहाद्वीपमध्ये अलकायदाचे 180 ते 200 दहशतवादी आहेत. हे दहशतवादी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि म्यांमारमध्ये आहेत. भारतीय उपमहाद्वीपमध्ये अलकायदा आयएसचा सहकारी आहे.

आयएसने भारतात नवीन राज्य बनवण्याचा दावा केला

आयएसने 10 मे 2019 ला आपली न्यूज एजेंसी अमाकच्या हवाल्याने दावा केला होता की, त्याने भारतात एक नवीन राज्य ‘विलायाह ऑफ हिंद’ तयार केला आहे. हा दावा काश्मीरमधील एका चकमकीनंतर करण्यात आला. या यकमकीत सोफी नावाचा दहशतवादी ठार झाला होता.