आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये शनिवारी कार आणि बसची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला तर बसचे नियंत्रण सुटल्याने ती चर्चच्या भिंतीला धडकली आणि भिंत कोसळली.
या अपघातात अनेक जण जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पठानमथिट्टा जिल्ह्यातील किझावल्लोरची आहे.
घटनेचा सीसीटीव्ही समोर
कार आणि बसच्या धडकेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. राज्य परिवहनची बस पुढे जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वेगाने येणाऱ्या कारला धडक दिल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या घटनेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी चर्चची भिंत तोडून बस आतमध्ये घुसली. बसमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही हे दिलासादायक आहे.
तपास सुरु
व्हिडिओ पाहून असे दिसते की, कार चालक गंभीर जखमी झाला असावा. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.