आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आलेला काही भाग(मुघल इतिहास, गुजरात दंगल आणि डार्विन सिद्धांत) पुन्हा शिकवण्यावरून नवा विरोधाभास समोर आला आहे. शालेय शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की, केरळमध्ये पुरवणी पुस्तकाच्या माध्यमातून धडे शिकवले जातील. हे राज्यातील अभ्यासक्रमाचा भाग असतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
कम्युनिस्ट सरकारच्या या निर्णयाला ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांतील लोकांनी विरोध केला आहे. या भीतीतून सरकार पुरवणी पुस्तिका लागू करण्यावर फेरविचार करत आहे. केरळमध्ये बहुतांश शाळा ख्रिश्चन आणि मुस्लिम व्यवस्थापनाअंतर्गत आहेत. त्यांना मुघल इतिहास आणि गुजरात दंगलीशी संबंधित धडे शिकवण्यावर आक्षेप नाही. मात्र, त्यांना डार्विन थेअरीवर गंभीर आक्षेप आहे. डार्विन थेअरी बायबल आणि कुराणच्या पवित्र ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या प्रजातिच्या उत्पत्तीच्या विपरीत असल्याचे मानले जाते. त्यात पृथ्वीवर ईश्वराची भूमिका फेटाळली आहे. या कारणाने ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांना भाजप-आरएसएससोबत असल्याचे समान कारण मिळत आहे. दुसरीकडे, केरळ कॅथॉलिक बिशप्प कॉन्फरन्सनेही(केसीबीसी) डार्विन थेअरीच्या पुस्तकावर तीव्र आक्षेप घेतला आहे.डार्विन सिद्धांतावर आक्षेप घेणे नवी बाब नाही. १९५७ मध्ये जेव्हा केरळमध्ये प्रथम कम्युनिस्ट सरकार सत्तेत आले होते तेव्हा ख्रिश्चन आणि मुस्लिम दोन्ही समाजांनी माकप आणि भाकपवर शालेय अभ्यासक्रमात नास्तिकता पसरवण्याचा आरोप केला होता. १९५९ मध्ये या समाजांनी कम्युनिस्ट सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरुद्ध “मुक्ती संघर्ष’ आंदोलन सुरू केले होते. परिणामी तत्कालीन जवाहरलाल नेहरू सरकारने राज्य सरकार बरखास्त केले होते.
पूरक पाठ्यपुस्तके शिकवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी साधले मौन
कम्युनिस्ट पक्षांनी मतांचा फटका बसू नये या भीतीतून या मुद्द्यावर मौन साधले आहे. सीएम पिनाराई विजयन यांनीही या प्रकरणातील वाढत्या विरोधामुळे या मुद्द्यावर मौन धारण केले आहे. याउलट ते गांधीजींच्या हत्येसंदर्भातील मजकूर हटवणे आणि इतिहासासाठी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून आरएसएसवर बंदी घालण्याविरुद्ध समोर आले होते. केरळमध्ये घटनात्मक आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना महत्त्व देऊन प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले होते. गुजरात दंगल आणि मुघल इतिहासासह वगळलेल्या विषयांचा अभ्यास केला जावा,असे केरळमध्ये वाटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.