आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळच्या पलक्कड येथे गर्भवती हत्तीच्या मृत्यूप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केरळचे वनमंत्री के. राजू यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. लवकरच यासंदर्भात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. या घटनेतील आरोपींचा सुगावा देणाऱ्याला केरळच्या दोन संघटनांनी दीड लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. यानंतरच अटक आणि ताब्यात घेण्याचे सत्र सुरू झाले.
केंद्रीय वन मंत्र्यांनी घेतली घटनेची गंभीर दखल
केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारीच एक ट्विट केले होते. त्यानुसार, ‘‘केंद्र सरकारने केरळमध्ये हत्तीच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यातील गुन्हेगाराला योग्य पद्धतीने पकडण्यात आम्ही कुठलीही गय करणार नाही. फटाके खाऊ घालणे आणि ठार मारणे ही भारतीय संस्कृती नाही.’’ केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात राज्याकडून अहवाल देखील मागवला. सोबतच, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोन खासगी संघटनांनी आरोपींचा सुगावा देणाऱ्यास बक्षीसची केली घोषणा
हत्तीच्या दोषींना पकडण्यात मदत करणे किंवा त्यांचा पत्ता ददेणाऱ्यांसाठी खासगी संघटनांनी लाखो रुपयांच्या बक्षीसांची घोषणा केली आहे. वाइल्ड लाइफ एसओएस एनजीओने दोषींचा पत्ता सांगणाऱ्याला 1 लाख रुपये देऊ अशी घोषणा केली. ही माहिती लोकांना 9971699727 या मोबाईल क्रमांक किंवा info@wildlifesos.org या ईमेल आयडीवर देता येईल. तसेच ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेने आरोपींची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपये देऊ असे जाहीर केले आहे. यास संस्थेला 7674922044 या क्रमांकावर व्हॉट्सअप करून माहिती पाठवता येईल.
अशी आहे घटना
केरळच्या पलक्कड येथे एक जंगली गर्भवती हत्तीचा पाण्यात उभ्या-उभ्या मृत्यू झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली. यानंतर सविस्तर तपास केला असता नवीन माहिती उघड झाली. त्यानुसार, ती काही दिवसांपूर्वी भुकेने जंगलातून भटकत रहिवासी भागात आली. रस्त्यावर भटकत असताना तिला कुणीतरी स्फोटकांनी भरलेले अननस खायला ठेवले. हेच खालल्यानंतर तिच्या तोंडात स्फोट झाला आणि काही तासानंतर तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर एका आठवड्यानंतर ही स्टोरी व्हायरल झाली. तेव्हापासूनच सेलिब्रिटी, नेते आणि सामान्य नागरिकांसह सगळेच या घटनेचा निषेध करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.