आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान मुलं खेळता खेळता कधी काय करतील याचा नेम नाही. नाणी असू दे, एखादी छोटी वस्तू असू दे किंवा खेळण्याचा छोटासा भाग. लहान मुलं आपल्या हाताला लागणारी प्रत्येक वस्तू नाकात किंवा तोंडात टाकतात. अशीच एक घटना तिरुअनंतपुरममध्ये घडली आहे. एका एका 2 वर्षाच्या मुलाने खेळकरपणे टीव्हीच्या रिमोटची बॅटरी गिळली.
पालकांनी ताबडतोब मुलाला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. जिथे आपत्कालीन परिस्थिती पाहून निम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे डॉक्टरांनी ऋषिकेशची एन्डोस्कोपी करून 20 मिनिटांत बॅटरी काढली.
पोटाच्या इतर कोणत्याही भागात बॅटरी गेली असती तर बाळाला आणखी त्रास होऊ शकला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भूल दिल्यानंतर बॅटरी काढली गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट जयकुमार यांनी त्यांच्या टीमसोबत मुलाच्या पोटातून 5 सेमी लांब आणि 1.5 सेमी रुंद बॅटरी काढली. त्यासाठी मुलाला भूल देण्यात आली. बाळ रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तयारी केली होती, त्यामुळे वेळीच बाळाचा जीव वाचला. अन् कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चॉकलेट खाल्ल्याने झाला मुलीचा मृत्यू
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात 20 जुलै रोजी एका 6 वर्षीय मुलीचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यू झाला. मुलीला शाळेत जायचे नव्हते. त्यामुळे आईने तिला चॉकलेट दिले.शाळेची बस येताच मुलीने रॅपरसह चॉकलेट खाल्ले. यामुळे तिचा जीव गुदमरला. बसच्या दरवाजाजवळ ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अडीच वर्षाच्या बालकाने गिळले 5 रुपयांचे नाणे
पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या अडीच वर्षांच्या मुलावर लँरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. अन्न आणि श्वासनलिकेत अडकलेले नाणे काढण्यास खासगी रुग्णालयाने नकार दिला होता. अखेरचा पर्याय म्हणून मुलास सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. कान-नाक-घसातज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांच्या पथकाने अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेद्वारे मुलास जीवनदान दिले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.