आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:महिनाभरात केरळात सर्वाधिक नवे रुग्ण, तर महाराष्ट्रात मृत्यू अधिक; 1.3 कोटीपेक्षा जास्त चाचण्यांसह कर्नाटक व तामिळनाडू पुढे

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील महिनाभरात मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात पुढे

देशात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची स्थिती प्रभावीपणे हाताळणाऱ्या केरळमध्ये सध्या दिवसाला सर्वाधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. मागील महिनाभरापासून सर्वाधिक १,४८,४२८ कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिवसाला सरासरी ४९४८ रुग्णांची नोंद झाली. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील एका महिन्यात महाराष्ट्रात १,२२,०६३ नवे रुग्ण आढळले, तर २१७३ मृत्यू झाले. दुसरीकडे केरळमध्ये ७९५ मृत्यू झाले. महाराष्ट्रात दिवसाला ७२ मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये हा आकडा २७ आहे. मृत्यूंच्या बाबतीत दिल्ली (२११८), प.बंगाल(१३८४) केरळपेक्षाही पुढे आहेत. नव्या रुग्णांच्या बाबतीत केरळ, महाराष्ट्रानंतर दिल्ली, प. बंगाल, राजस्थान व उत्तर प्रदेशाचा क्रमांक आहे.

युरोपात ब्रिटनमध्ये आढळताहेत सर्वाधिक रुग्ण
मागील महिनाभरात युरोपमध्ये ब्रिटनमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळत आहेत. नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर तेथील स्थिती आणखी बिकट होत आहे. २० डिसेंबरला ब्रिटनमध्ये २७३८१ नवे रुग्ण आढळले होते, तर रशियामध्ये २७३४६ रुग्ण आढळले होते. जर्मनी(२३४५०), इटली (१५६३९) आणि फ्रान्समध्ये १२८८५ रुग्णांची नोंद झाली आहे.

1.3 कोटीपेक्षा जास्त चाचण्यांसह कर्नाटक व तामिळनाडू पुढे
देशात दिवसाला २५ हजार रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण सप्टेंबरच्या पीकपेक्षा सुमारे ७० टक्के कमी आहे. १.३ कोटीहून जास्त चाचण्या करत कर्नाटक व तामिळनाडू ही राज्ये चाचण्या करण्याच्या बाबतीत देशात आघाडीवर आहेत.

(आकडे २० नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंतचे आहेत. स्रोत- आरोग्य मंत्रालय)
(आकडे २० नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंतचे आहेत. स्रोत- आरोग्य मंत्रालय)
बातम्या आणखी आहेत...