आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालक नशेत असला तरीही विमा कंपनीस भरपाईचे बंधन:वाहन अपघातप्रकरणी केरळ हायकोर्टाचा निकाल

तिरुवनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ उच्च न्यायालयाने माेटार वाहन दुर्घटना कायद्यात नुकसान भरपाईवरून महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दुर्घटनेच्या वेळी चालक नशेच्या अवस्थेत असला तरीही तिसऱ्या पक्षाला भरपाई देणे विमा कंपनीस बंधनकारक आहे,असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती साेफी थाॅमस म्हणाले, नशेत असताना वाहन चालवल्यास कंपनी दाव्याबाबत जबाबदार राहणार नाही, असे पाॅलिसीच्या शर्तीमध्ये समाविष्ट आहे. तरीही कंपनीला तिसऱ्या पक्षाला भरपाई द्यावी लागेल. कंपनी नंतर ही रक्कम चालक व वाहनमालकाकडून वसूल करू शकते. हायकाेर्टाने हा निर्णय माेहंमद राशिदच्या एका याचिकेवर दिला. त्यात माेटार अपघात लवादच्या नुकसान भरपाईच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले हाेते. पुरेशी भरपाई नसल्यामुळे हे आव्हान देण्यात आले हाेते. २०१३ मध्ये आॅटाेतून जाताना कारला धडक झाली हाेती. त्यात आपण गंभीर जखमी झाल्याचा दावा राशिदने याचिकेतून केला. चालक नशेत हाेता. त्यामुळे भरपाई देणे बंधनकारक नसल्याचे विमा कंपनीने म्हटले हाेते.

बातम्या आणखी आहेत...