आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Highcourt Updates: Kerala High Court Comment On Women Employment Work At Night: News And Live Updates

निर्वाळा:रात्री काम करावे लागेल या सबबीवर महिलांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही : हायकोर्ट

कोची9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमधील मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेडची अधिसूचना रद्दबातल

रोजगाराच्या दृष्टीने एखादी महिला योग्य असतानाही कामाच्या स्वरूपाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी हा निर्वाळा दिला. न्यायमूर्ती अनू शिवरामन म्हणाले, एखादा योग्य उमेदवार आहे. ती महिला आहे. परंतु रात्रीच्या वेळी काम करावे लागेल म्हणून नियुक्ती करण्यास नकार देता येऊ शकत नाही. किंबहुना महिला नोकरीसाठी योग्य असणे हीच नोकरीसाठी सुरक्षात्मक आहे, असे कोर्टाने सुनावले. केरळ मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेडने नोकरीसाठी अधिसूचना जारी केली होती. कोर्टाच्या निकालामुळे ती आता रद्द झाली. त्यात नोकरीसाठी पुरुष उमेदवारांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती.

अशा प्रकारची अधिसूचना भारतीय संविधानातील कलम १४,१५ व १६ च्या तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे, असे काेर्टाने स्पष्ट केले. फॅक्ट्रीज अॅक्ट १९४८ च्या तरतुदीनुसार महिलांचे कार्यस्थळी शोषणापासून संरक्षण करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. याचिकाकर्ता ट्रेजा जोसफीन यांनी कंपनीच्या सेफ्टी ऑफिसरपदासाठी नोकरीच्या अधिसूचनेला आव्हान दिले होते. ट्रेजा कंपनीत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (सेफ्टी) आहेत. ही अधिसूचना भेदभाव करणारी आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यस्थळी अधिक चांगले वातावरण आणि समानता असावी. परिस्थितीचा हवाला देऊन महिलांना रोजगाराच्या संधीपासून वंचित करू नये. आपण निम्म्या लोकसंख्येला जास्तीत जास्त संधी निर्माण करून द्यावी, असे काेर्टाने सांगितले.

महिलांना केवळ घरकामात का अडकवताय ?
कोर्ट म्हणाले, जग पुढे जात आहे. अशा काळात महिलांना केवळ घरकामात का अडकवताय? खरे तर आर्थिक विकासाच्या क्षेत्रात महिलांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा वळणावर आपण येऊन ठेपलेलो आहोत. महिलांना आरोग्य सेवा, हवाई क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञानासह अनेक उद्योगांतही वेळोवेळी नोकरी दिली जात आहे. अशा प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करून कोणताही काळ-वेळ असो, महिलांनी सक्षम असल्याचे सिद्ध केले.

बातम्या आणखी आहेत...