आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अचूक देखरेख यंत्रणा, बळकट आरोग्य सुविधा आणि वेळेवर योग्य निर्णय घेतल्याने केरळने कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. या कोरोना काळात स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला. केरळने या मजुरांचीही काळजी घेतली. या घडामोडींवर अनेक कथा आहेत. यातील एक गोष्ट राज्याचे नवे मुख्य सचिव डॉ.विश्वास मेहता यांची आहे. डॉ. मेहतांना केरळमधील कोरोना विरोधातील लढाईतील प्रमुख योद्धा मानले जाते. ते गेल्या ३३ वर्षांपासून केरळमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी केरळमध्ये स्थलांतरित मजुरांना “अतिथी कामगार’ असे संबोधले. केरळमध्ये ५ लाखांहून जास्त स्थलांतरित मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यांना आवडीचे जेवण देण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना २०० रुपयांचा रिचार्जही करून दिला. डॉ. मेहता सांगतात की, अशा संकटाच्या काळात आपण सुखरूप असल्याची बातमी मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांना देता यावी, ही माझी इच्छा होती. मजुरांच्या कॉल सेंटरमध्ये ६ भाषांचे ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले. डॉ. मेहतांनी केंद्रात व राज्यात आरोग्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. या पदावर असताना त्यांनी स्वाइन फ्लू आणि इबोला संकटाच्या वेळी चांगले काम केले होते. कोरोना काळात हाच अनुभव त्यांच्या कामी आला.
राजस्थानच्या डॉ. मेहतांनी जिंकले केरळचे मन
डॉ. मेहता हे मूळचे राजस्थानातील डुंगरपूर येथील रहिवासी आहेत. ते राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेत समतोल राखण्यासाठी ओळखले जातात. गेल्या आठवड्यात केरळ सरकारने त्यांना राज्याचे मुख्य सचिव बनवण्याचा निर्णय घेतला. ते १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जून १९८७ मध्ये कोल्लमचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. त्यांनी आरोग्य सचिव, शिक्षण सचिव, महसूल सचिव म्हणून काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.