आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kerala Government Has Fixed The Minimum Price Of Vegetables, Potato Lady Finger 20, Tomato 8 And Bitter Gourd Will Be Rs. 30

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भाज्यांचे किमान भाव निश्चित करणारे केरळ देशातील पहिले राज्य; बटाटे-भेंडी 20 रु., टोमॅटो-कारले असेल 30 रुपये किलो

तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ सरकारने शेतकऱ्यांसाठी 16 भाज्यांचे भाव निश्चित केले, 1 नोव्हेंबरपासून योजना लागू

शेतकऱ्यांसाठी फळे आणि भाज्यांचे किमान भाव (एमएसपी) निश्चित करणारे केरळ देशातील पहिले राज्य ठरले आहे. हे भाव उत्पादन खर्चापेक्षा २० टक्के अधिक असतील. सध्या सरकारने १६ फळे-भाज्यांचे भाव निश्चित केले आहेत. याशिवाय २१ खाद्यान्नासाठी एमएसपी निश्चित केली आहे. ही योजना १ नोव्हेंबरपासून लागू होईल. तोवर राज्यात उत्पादित होणाऱ्या इतर फळ-भाज्यांचे भाव निश्चित केले जातील. याचा लाभ १५ एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. ही फळे-भाज्या विकण्यासाठी राज्यात १ हजार स्टोअर्स उघडली जातील. केरळनंतर आता पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यातील शेतकरीही ही योजना लागू करण्याची मागणी करत आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंगळवारी सांगितले, की ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या भाज्यांचे किमान विक्री मूल्य त्याच्या उत्पादन खर्चाहून २० टक्के अधिक असेल. बाजारभाव यापेक्षा कमी झाला तर शेतकऱ्यांचे हे उत्पादन किमान हमीभावाने खरेदी केले जाईल. आता महाराष्ट्रातही शेतकरी अशीच मागणी करत आहेत. तीन वर्षांपूर्वी येथे शेतकऱ्यांना द्राक्षे अवघी १० रुपये किलो भावाने विकावी लागली होती आणि याचा उत्पादन खर्च होता तब्बल ४० रुपये. पंजाबमध्येही शेतकऱ्यांची हीच मागणी आहे. केरळचे कृषितज्ज्ञ जी. जनार्दन यांच्यानुसार, एमएसपी निश्चित केल्याने शेतकरी फळे व भाज्यांचे उत्पादन घेतील. या उत्पादनाला निश्चित भाव मिळणार असल्याची हमी असेल. शिवाय, याचा ग्राहकांवर फार परिणाम होणार नाही. कारण, ग्राहक तर नेहमीच या फळांसाठी व भाज्यांसाठी जास्तीचा भाव देत आहेत. फक्त शेतकऱ्यांच्या खिशात तो जात नाही. हा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात जावा आणि त्याला शेती सुधारण्यासाठी मदत व्हावी, हा यामागील उद्देश आहे.