आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Karnataka Rainfall Flood Updates । Monsoon 2022 Latest Video Footage | Bangalore News

केरळ, कर्नाटक, आंध्रमध्ये मुसळधार पावसाचा इशारा:बंगळुरूत IT वर्कर्स ट्रॅक्टरवरून चालले ऑफिसला, विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

बंगळुरू/तिरुअनंतपुरम23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मंगळवारी 8 आणि 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक भागांत पाणी तुंबले असून रस्त्यांवर होड्यांचा वापर सुरू आहे. सिलिकॉन व्हॅली म्हटल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, येथे आयटी कर्मचारी ट्रॅक्टरवरूर ऑफिस गाठताना दिसत आहेत.

बंगळुरूत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पाणी साचलेल्या रस्त्यावर स्कूटी घसरल्यानंतर तिने जवळच बसवलेला विद्युत खांब आधारासाठी धरण्याचा प्रयत्न केला, मात्र विजेचा धक्का लागल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. व्हाईटफील्ड परिसरात संध्याकाळी ही मुलगी कामावरून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

कर्नाटक: 50 रुपये देऊन ट्रॅक्टरने जात आहेत IT वर्कर्स...

बंगळुरूमध्ये संततधार पावसामुळे वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बाहेरील भागात पूर आला आहे. जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे.

IT कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी ट्रॅक्टरने त्यांच्या कार्यालयात जात आहेत. पावसामुळे आमच्या कामावर परिणाम झाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, 50 रुपये देऊन ट्रॅक्टरने ऑफिसला जात आहोत. यावर कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आयटी कंपन्यांशी बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणारे आयटी कामगार बेंगळुरूमध्ये ट्रॅक्टरवर ऑफिसला जाताना.
सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणारे आयटी कामगार बेंगळुरूमध्ये ट्रॅक्टरवर ऑफिसला जाताना.
पावसाच्या पाण्यात अडकलेली कार रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न करणारे लोक.
पावसाच्या पाण्यात अडकलेली कार रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न करणारे लोक.
मुसळधार पावसामुळे बंगळुरूमध्ये रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे समस्या निर्माण होत आहेत.
मुसळधार पावसामुळे बंगळुरूमध्ये रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे समस्या निर्माण होत आहेत.
बंगळुरूमधील एका शाळेचा व्हिडिओ सोमवारी समोर आला. यामध्ये मुले बादलीतून पाणी काढताना दिसत आहेत.
बंगळुरूमधील एका शाळेचा व्हिडिओ सोमवारी समोर आला. यामध्ये मुले बादलीतून पाणी काढताना दिसत आहेत.

केरळ : अचानक आलेल्या पुरात 2 जणांचा मृत्यू

केरळची राजधानी तिरुवनंतपुरमजवळ असलेल्या एका पाण्याच्या धबधब्याला मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. मनकायम धबधब्यावर 10 जणांचा ग्रुप फिरायला गेला होता. हे लोक दगडावर होते. अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात दोन जण वाहून गेले. त्यात आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. हवामान खात्याने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यांत मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय अलप्पुझा, कोयट्टम आणि एर्नाकुलममध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तामिळनाडू: भूस्खलनामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे निलगिरीमध्ये वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. कल्लार ते हिलग्रोव्ह दरम्यानचा रेल्वे ट्रॅक भूस्खलनामुळे मातीखाली गाडला गेला आहे. अनेक ठिकाणी दगडही पडले आहेत. त्यामुळे मेट्टुपलायम ते कुन्नूरदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मान्सूनचा हंगाम संपण्यास विलंब होऊ शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...