आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Kozhikode Nipah Virus 12 Year Old Boy Died Alert In State; News And Live Updates

केरळमध्ये निपाहचा धोका:कोझिकोडमध्ये निपाह विषाणूमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, केरळमध्ये 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा निपाह विषाणूची एन्ट्री

तिरुअनंतपुरम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राचे राज्य सरकारला आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश

केरळ राज्यात एकीकडे कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढत आहे. तर दुसरीकडे, निपाह विषाणूचा धोकाही वाढला आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये रविवारी या विषाणूमुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतक युवकावर जवळीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मृतकाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून यामध्ये कोणालाही हे लक्षणे आढळले नाहीत. विशेष म्हणजे निपाह विषाणूने राज्यात 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रवेश केला आहे. 2018 मध्ये या विषाणूमुळे 17 लोकांचा मृत्यू झाला होता.

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सदरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोझिकोडचा दौरा केला. दरम्यान, जॉर्ज म्हणाल्या की, आम्ही सदरील परिस्थिती हाताळण्यासाठी एका टीमची स्थापना केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर उपाय आधीच सुरू केले गेले आहेत. आपल्याला या विषाणूमुळे घाबरण्याची कोणतीच गरज नसून फक्त सावधगिरी बाळगली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

केंद्राचे राज्य सरकारला आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश
केरळ राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणाने केंद्र सरकार आधीच चिंतेत आहे. निपाह विषाणूने आणखी केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक पथक पाठवले आहे. यासोबतच निपाह विषाणूबाबत राज्य सरकारला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात गेल्या 12 दिवसांमध्ये पीडितेच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्यात यावी आणि अशा लोकांना काही दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

या विषाणूमुळे 2018 मध्ये राज्यात 17 लोकांचा मृत्यू
केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांत 2018 मध्ये या विषाणूमुळे 17 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाह हा झूनोटिक विषाणू आहे. हा विषाणू वटवाघळ आणि डुकरांसारख्या प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. विशेष म्हणजे या विषाणूचा मृत्यू दर इतर विषाणूपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत यावर कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...