आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात केरळसारखे कृत्य:शेतात घुसल्यामुळे कुऱ्हाडीने कापला उंटाचा पाय, थांबवायला आलेल्या लोकांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

चेरू2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मादी उंटाचा एक पाय शरीरापासून वेगळा तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये स्फोटके खाऊ घातल्याने मादा हत्तीचा मृत्यू झाल्याची निंदनीय घटना घडली होती. त्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली होती. आता त्या घटनेप्रमाणेच क्रुर घटना शनिवारी राजस्थानातील साजनसर गावात घडली आहे. चार वर्षीय मादा उंट शेतात घुसल्यामुळे तिघांनी उंटावर कुऱ्हाडीचे वार केले. या हल्ल्यात उंटाचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला, तर दुसऱ्या पायावर गंभीर दुखापत आझील. वेळीच उपचार झाल्यामुळे उंटाचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, उंटाचा आवाज ऐकुन गावातील लोकांनी पोलिसांना सूचना दिली. उंटाला साजनसर गावातील गौशाळेत पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी सोशस मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

याप्रकरणी उंटावर उपचार करणारे डॉ. प्रवीण शर्माने सांगितले की, उंटाचे खूप रक्त गेले होते. वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. उंटाचा एक पाय वेगळा झाला आहे, त्याला आता परत जोडता येणार नाही.

गावातील तिघांविरोधात तक्रार

याप्रकरणी गावातील ओमप्रकाश सिंह यांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ओमप्रकाशने सांगितले की, ते आणि नोपाराम जाट गावातील रोहीमध्ये सकाळी गुरे चारण्यासाठी गेलो होते. तेव्हा एक उंट पळताना दिसली आणि तिच्या मागे गावातील पन्नाराम, गोपीराम आणि लिछूराम पाठलाग करत होते.

जीवे मारण्याची धमकी दिली

आरोपींच्या हातात कुऱ्हाड होती. शेतात कुंपण आल्यामुळे उंट तिथे अडकली, यानंतर तिघांनी उंटावर कुऱ्हाडीचे वार केले. त्यांना थांबवण्यासाठी गेल्यावर, आम्हालाच जीवे मारण्याची धमकी दिली. उंटाचा पाय कापणं झाल्यावर आरोपींनी तेथून पळ काढला, अशी माहिती ओमप्रकाश यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...